रेल्वे कर्मचाऱ्याने आईसह पत्नीचा केला खून; पाच महिन्यापूर्वीच झाला होता विवाह, पण…

शहरातील बालाजी लॉन परिसरात असलेल्या शगुन इस्टेटमध्ये कौटुंबिक वादातून पत्नीसह आईची हत्या केल्याची घटना मंगळवारी पाहटे घडली आहे. या घटनेमुळे शहरात मोठी खळबळ उडाली आहे. या हत्याकांडात रेल्वे कर्मचाऱ्याने आपल्या वयोवृद्ध आईसह पत्नीच्या डोक्यात लोखंडी वस्तूने वार करत निर्घृण खून केला.

    भुसावळ : शहरातील बालाजी लॉन परिसरात (Balaji Lawns) असलेल्या शगुन इस्टेटमध्ये कौटुंबिक वादातून पत्नीसह आईची हत्या (Murder News) केल्याची घटना मंगळवारी पहाटे घडली. या घटनेमुळे शहरात मोठी खळबळ उडाली आहे. या हत्याकांडात रेल्वे कर्मचाऱ्याने आपल्या वयोवृद्ध आईसह पत्नीच्या डोक्यात लोखंडी वस्तूने वार करत निर्घृण खून केला.

    याबाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील बालाजी लॉन परिसरात असलेल्या शगुन इस्टेटमधील रहिवासी हेमंत श्रवणकुमार भूषण हे भुसावळ रेल्वे विभागात चतुर्थश्रेणी कर्मचारी म्हणून कार्यरत आहेत. गेल्या पाच महिन्यांपूर्वीच त्यांचे आराध्या हेमंत भूषण (२३) हिच्याशी लग्न झाले होते. यांच्यासोबत आई सुशीलादेवी भूषण (६३) या सुद्धा वास्तव्यास होत्या. दरम्यान, लग्न झाल्यापासून दोघांमध्ये वाद होत होता.

    दरम्यान, मंगळवारी मध्यरात्री दोघं पती-पत्नीमध्ये भांडण झाले. या वादात आईने मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. मात्र, हेमंत भूषण हा ऐकूण घेण्याच्या मनस्थितीत नव्हता. त्याने रागाच्या भरात पहाटे बेडरुममध्ये झोपलेल्या पत्नीच्या डोक्यात लोखंडी वस्तू मारून जखमी केले. हा प्रकार लक्षात येताच हेमंतची आई धावत आली आणि त्यांनी हेमंतला विरोध केला असता. हेमंतने ६३ वर्षीय आईच्या डोक्यातही लोखंडी वस्तू मारून खून केला.

    वाद मिटविण्यासाठी मित्र आला होता घरी

    गेल्या पाच महिन्यांपूर्वीच हेमंत व आराध्या यांचे लग्न झाले होते. मात्र, हेमंतला पत्नी आराध्या आवडत नसल्याने त्यांच्यात कायम वाद होत होते. दाम्पत्यातील हा वाद मिटवण्यासाठी मुंबईतील उच्चशिक्षित सॉप्टवेअर अभियंता तथा आरोपीचा मित्र शालक ऋभ (२६) हा सोमवारीच भुसावळात आला होता.