सोशल मीडियावर ओळख झाली, लग्नाचे आमिष दाखवून वारंवार संबंध ठेवले अन् गर्भवती होताच…

सोशल मीडियाच्या माध्यमातून 20 वर्षीय तरूणीशी मैत्री करत तिला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर वारंवार अत्याचार केला. यातून ती तरुणी 23 आठवड्याची गर्भवती राहिली. ही घटना हिंगणघाट पोलिस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या एका गावात घडली.

    हिंगोली : सोशल मीडियाच्या माध्यमातून 20 वर्षीय तरूणीशी मैत्री करत तिला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर वारंवार अत्याचार केला. यातून ती तरुणी 23 आठवड्याची गर्भवती राहिली. ही घटना हिंगणघाट पोलिस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या एका गावात घडली.

    या प्रकरणी दाखल तरुणीच्या तक्रारीवरून, आकाश कुरसुंगे (रा. राळेगाव, जि. यवतमाळ) याच्याविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पोलिसांत नमूद तक्रारीनुसार, 20 वर्षीय तरूणीची सोशल मीडियाच्या माध्यमातून मैत्री झाली. एकमेकांचे फोनवर बोलणे सुरू झाले. भुलथापा देवून तरुणाने तरुणीला प्रेमजाळ्यात ओढले. मुलीच्या घरी कुणी नसताना त्याचे तिच्या घरी येणे-जाणे सुरू झाले.

    तरुणीचा लग्नाचे आमिष दाखवून जवळीकता वाढविली. वेळोवेळी तरुणाने बळजबरीने तरुणीशी शारिरीक संबंध प्रस्थापित केले. यातून तरुणी 23 आठवड्याची गर्भवती राहिली. उपचारासाठी नागपूर येथील मेडीकल रुग्णालयात गेली असता तिथे तिचा गर्भपात करण्यात आला. याप्रकरणी नोंदविण्यात आलेल्या जबानीवरून तरुणीविरुद्ध अत्याचाराचा गुन्हा नोंद करण्यात आला.