संग्रहित फोटो
संग्रहित फोटो

पती-पत्नीच्या भांडणात मध्यस्थी करण्यासाठी आलेल्या सासूसोबत जावयाने वाद घातला. यावरून सासरच्या मंडळींनी जावयावर प्राणघातक हल्ला चढवून त्याला गंभीररित्या जखमी (Attack on Son-in-Law) केले. त्याच्या दुचाकीचेही नुकसान केले.

    नागपूर : पती-पत्नीच्या भांडणात मध्यस्थी करण्यासाठी आलेल्या सासूसोबत जावयाने वाद घातला. यावरून सासरच्या मंडळींनी जावयावर प्राणघातक हल्ला चढवून त्याला गंभीररित्या जखमी (Attack on Son-in-Law) केले. त्याच्या दुचाकीचेही नुकसान केले. प्रतापनगर परिसरात ही घटना घडली. याप्रकरणी पोलिसांनी तिघांना अटक केली असून, जखमीवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

    विजय धनराज सोमकुवर (वय 37 रा. सुभाषनगर परसीस्टन्ट बिल्डींग मागे) असे जखमी जावयाचे नाव आहे. तर रोमीत प्यारेलाल नाहरकर (वय 34), रोहन प्यारेलाल नाहरकर (वय 30, दोघेही रा. सिमटाकळी, हिंगणा) आणि अंकित राममूर्ती चिमोटे (वय 30, रा. गायत्रीनगर) अशी आरोपींची नावे आहेत. सोमकुवर हे गेल्या दहा वर्षांपासून सासू बेबी वानखेडे यांच्याकडे पत्नीसह वास्तव्यास आहेत. २३ ऑक्टोबरला मध्यरात्री विजय यांचे पत्नीसोबत भांडण झाले. यावेळी त्यांची सासू बेबी ही मध्यस्थीसाठी धावून आली.

    विजयचे सासूसोबतही भांडण झाले. त्यामुळे सासू तिच्या लक्ष्मीनगर येथे दुसऱ्या मुलीकडे गेली. त्याच दिवशी रात्री 8 च्या सुमारास आरोपींनी शिवीगाळ सुरू केली. विजय यांनी आरोपींना रोखले असता, त्यांनी त्याला हातबुक्कीने मारहाण करुन धारधार चाकूने छातीवर व हातावर वार केले. यावेळी आरोपींनी विजय यांच्या दुचाकीवरही दगड फेकले. याप्रकरणी विजय यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपींविरुध्द गुन्ह्याची नोंद करून अटक केली आहे. तर जखमीवर मेडिकल हॉस्पीटल येथे उपचार सुरू आहे.