चक्क बैलगाडीतून विद्यार्थ्यांची शाळेत हजेरी

जिल्हा परिषदेच्या शाळेचा पहिला दिवस. शाळेत आलेल्या अनेक विद्यार्थ्यांचे शाळेच्या व्यवस्थापनाकडून स्वागत करण्यात आले. यावेळी विशेष आकर्षण ठरले ते बैलगाडीतून (Bullock Cart) शाळेत हजेरी लावलेल्या विद्यार्थ्यांचे.

    वडगाव निंबाळकर : जिल्हा परिषदेच्या शाळेचा पहिला दिवस. शाळेत आलेल्या अनेक विद्यार्थ्यांचे शाळेच्या व्यवस्थापनाकडून स्वागत करण्यात आले. यावेळी विशेष आकर्षण ठरले ते बैलगाडीतून (Bullock Cart) शाळेत हजेरी लावलेल्या विद्यार्थ्यांचे. यावेळी सर्व विद्यार्थ्यांना फेटे, फूल, खाऊ, वह्या व पुस्तक वाटप करण्यात आले. अगदी मोठ्या उत्साहाने व आनंदात शाळेत आलेल्या विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले.

    यावेळी शाळेच्या शिक्षिका नलवडे यांनी शाळेविषयी गौरोद्गार काढले. त्या म्हणाल्या, ‘मराठी शाळा चांगली आहे. शाळेत मनासारखे शिक्षण, खेळ, आनंद व लहानपणातील आनंद घेता येतो. तसेच चांगल्याप्रकारे शिक्षण दिले जाते. मुलांचा लक्षपूर्वक अभ्यास करून घेतला जातो’.

    यावेळी मुलांचे पालक म्हणून विजय दरेकर, पिंटू पानसरे, बाळासाहेब पापळ, सिद्दिनाथ दरेकर, नाना पवार, किशोर दरेकर, संतोष दरेकर, सीमा राऊत, लता गायकवाड, शाळा व्यवस्थापन अध्यक्ष सुभाष राऊत उपस्थित होते.