सासरच्या जाचाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या; सासू, सासरे व पतीला अटक

चांदूरबिस्वा सासर असलेल्या विवाहितेने पुणे येथे सासरच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केली. ही घटना पुणे येथे घडली. याविरुद्ध विवाहितेच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीवरून, सासू, सासरे व पतीविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले. या सर्वांना पुणे येथे अटक करण्यात आली आहे.

    मलकापूर : चांदूरबिस्वा सासर असलेल्या विवाहितेने पुणे येथे सासरच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केली. ही घटना पुणे येथे घडली. याविरुद्ध विवाहितेच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीवरून, सासू, सासरे व पतीविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले. या सर्वांना पुणे येथे अटक करण्यात आली आहे.

    याबाबतची माहिती मृत विवाहितेचा वडील रमेश रामभाऊ चोपडे (वय 53, रा. माता महाकालीनगर, मलकापूर, जि. बुलडाणा यांनी पिंपरी चिंचवड पोलिस स्टेशनला दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, माझी मुलगी दीक्षा हिचा विवाह 8 मे 2021 रोजी पवन प्रल्हाद तायडे, (रा. हनुमाननगर, चांदूरबिस्वा, ता. नांदुरा, ह.मु. म्हसोब मंदिरजवळ, गवळीनगर, भोसरी, पुणे) यांच्याशी झाला होता. लग्नानंतर मुलगी रक्षाबंधनाला माहेरी आली असता तिने पती व सासू-सासरे यांनी काही दिवस चांगली वागणूक दिली. मात्र, आता ते काहीना काही कारणावरून बोलतात व पती मारहाण करून त्रास देतो, असे सांगितले होते.

    फ्लॅट घेण्यासाठी माहेरवरून 10 लाख रुपये आणण्याचा लावण्यात आलेला तगादा, सासरकडील मंडळीच्या इच्छेविरुद्ध मुलास जन्म दिला म्हणून नेहमी सासरकडील मंडळीकडून होणारा त्रास व मारहाणीला कंटाळून अखेर दीक्षा हिने 25 नोव्हेंबर रोजी घरात गळफास लावून आत्महत्या केली. तत्पूर्वी तिने 3 पानाची सुसाईड नोट लिहून त्यामध्ये सासरकडील मंडळीकडून होणाऱ्या त्रासाबाबत लिहिले आहे.

    या तक्रारीवरून पोलिस स्टेशन पिंपरी चिंचवड येथे पती पवन प्रल्हाद तायडे, सासू प्रमिला तायडे, सासरा प्रल्हाद लक्ष्मण तायडे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. पोलिसांनी तिघांनाही अटक केली आहे.