big news climax of brutality in talasari taluka minor girl was raped and killed shocking incident read in detail nrvb
प्रतिकात्मक फोटो

विवाहित व्यक्तीने मनोरुग्ण तरुणीशी जवळीक साधून तिच्यावर बलात्कार केला. यात त्याच्या पत्नीने त्याला मदत  केली. याविषयी विचारणा करणाऱ्या तरुणीच्या भाऊ-वडील यांना शिविगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिली.

    पिंपरी : विवाहित व्यक्तीने मनोरुग्ण तरुणीशी जवळीक साधून तिच्यावर बलात्कार केला. यात त्याच्या पत्नीने त्याला मदत  केली. याविषयी विचारणा करणाऱ्या तरुणीच्या भाऊ-वडील यांना शिविगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिली. ही घटना  मे २०२२ ते मार्च २०२३ या कालावधीत निगडी, पुणे, येलवाडी या परिसरात घडली. या प्रकरणी तरुणीच्या आईने निगडीपोलिस ठाण्यात रविवारी फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी आरोपी माणिक नानाबाऊ होरे (वय ३५) याला अटक केली असून एका महिलेवर गुन्हा दाखल केला आहे.
    पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्या मुलीचा विश्वास संपादन करून तसेच ती मनोरुग्ण असल्याचे माहिती असून देखील आरोपी माणिक याने तिच्या जबरदस्तीने बलात्कार केला. फिर्यादीच्या पतीने याबाबत आरोपीला फोन करून जाब विचारला असता त्यांना शिवीगाळ करत त्यांचा मुलगा आणि त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली. या सगळ्यामध्ये आरोपीच्या पत्नीने तिला साथ दिली, असे फिर्यादीत नमूद आहे