suicide

एका 19 वर्षीय तरूणीला चांगलं शिक्षण घेऊन नोकरी करायची होती. मात्र, घरच्यांना आपल्या जबाबदारीतून मोकळे व्हायचे होते. शिक्षण घेत असतानाच तिचे लग्न लावून दिले. लग्न लावून दिल्याने तिला आपल्या स्वप्नांचा चुराडा झाल्याची भावना मनामध्ये होती.

    नागपूर : एका 19 वर्षीय तरूणीला चांगलं शिक्षण घेऊन नोकरी करायची होती. मात्र, घरच्यांना आपल्या जबाबदारीतून मोकळे व्हायचे होते. शिक्षण घेत असतानाच तिचे लग्न लावून दिले. लग्न लावून दिल्याने तिला आपल्या स्वप्नांचा चुराडा झाल्याची भावना मनामध्ये होती. अखेर नैराश्यात जाऊन या तरूणीने टोकाचे पाऊल उचलत आत्महत्या (Woman Suicide) केली. ही घटना कळमना पोलिस ठाण्यांतर्गत उघडकीस आली.

    प्रतीक्षा राहांगडाले (वय 19, रा. भरतवाडा) असे मृत तरुणीचे नाव आहे. प्रतीक्षाने तांत्रिक शिक्षण घेतले होते. पुढे उच्च शिक्षण घेऊन तिला नोकरी करायची होती. याबाबत तिने कुटुंबीयांना सांगितले सुद्धा होते. मात्र, आपल्या जबाबदारीतून मोकळे होण्यासाठी कुटुंबीयांनी तिचे लग्न करून दिले.

    लग्नानंतर ती नैराश्यात राहू लागली. मंगळवारी पती व तिचे सासरे कामावर गेले होते. घरी कुणी नसल्याने छताच्या पंख्याला गळफास लावून तिने आत्महत्या केली.