मुंबईमधील बीकेसी परिसरातील सरकारी इमारतीला भीषण आग

मुंबईमध्ये बीकेसी परिसरातील सरकारी कार्यलयाला आग लागल्याने सगळीकडे खळबळ माजली आहे. अचानक लागलेल्या आगीमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

    मुंबईमध्ये बीकेसी परिसरातील सरकारी कार्यलयाला आग लागल्याने सगळीकडे खळबळ माजली आहे. अचानक लागलेल्या आगीमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. निवृत्ती वेतन विभागाच्या चौथ्या आणि पाचव्या मजल्याला अचानक आग लागली. अचानक लागलेल्या आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशामक दलाकडून अथक पप्रयत्न केले जात आहेत. कार्यालयात लागलेल्या आगीचे कारण अद्याप समोर आलेले नाही. आग लागल्याची घटना घडताच अग्निशमन दलाच्या चार गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. मात्र अजूनही आग विझवण्याचे काम सुरु आहे.