नवाब मलिकांच्या प्रकृती तपासणीसाठी वैद्यकीय मंडळ नेमावे; ईडीची विशेष न्यायालयाकडे मागणी

मलिक अनेक दिवसांपासून मूत्राशयाच्या त्रासाने त्रस्त असून न्यायालयाच्या परवानगीनंतरच मलिक सध्या कुर्ल्यातील खासगी रुग्णालयात दाखल आहेत. गुरुवारी विशेष न्यायालयाचे न्यायाधीश न्या. राहुल रोकडे यांच्यासमोर सुनावणी झाली. कारागृहात रहावे लागू येऊ नये म्हणून मलिक न्यायालयाकडून मिळालेल्या परवानगीचा गैरफायदा घेत असल्याचा आरोप ईडीकडून करण्यात आला.

    मुंबई : अंडरवर्ल्डशी संबंध (Connection with the underworld) आणि मनी लाँड्रिंग प्रकरणी (money laundering case) अटक करण्यात आलेल्या माजी अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांच्या प्रकृतीसाठी वैद्यकीय मंडळाची स्थापना करण्यात यावी, अशी मागणी गुरुवारी ईडीच्यावतीने करण्यात आली (A demand was made on Thursday on behalf of the ED that a medical board should be established for Prakriti).

    ईडीने अंडरवर्ल्ड डॉन दाऊदच्या हस्तकाशी संबंधित असलेल्या सुमारे ३०० कोटींच्या मालमत्तेचा व्यवहार करणाऱ्या कंपनीशी मलिक यांचा संबंध असल्याचे समोर येताच ‘ईडी’ने कारवाई करत मलिक यांना मनी लाँड्रिंग प्रकरणी २३ फेब्रुवारी रोजी अटक केली. तेव्हापासून मलिक कारागृहात आहेत.

    मलिक अनेक दिवसांपासून मूत्राशयाच्या त्रासाने त्रस्त असून न्यायालयाच्या परवानगीनंतरच मलिक सध्या कुर्ल्यातील खासगी रुग्णालयात दाखल आहेत. गुरुवारी विशेष न्यायालयाचे न्यायाधीश न्या. राहुल रोकडे यांच्यासमोर सुनावणी झाली. कारागृहात रहावे लागू येऊ नये म्हणून मलिक न्यायालयाकडून मिळालेल्या परवानगीचा गैरफायदा घेत असल्याचा आरोप ईडीकडून करण्यात आला. त्यामुळे त्यांच्या प्रकृतीची पडताळणी करण्यासाठी वैद्यकीय मंडळाची स्थापना करण्यात यावी, अशी मागणीही ईडीने केली. त्याची दखल घेत न्यायालयाने मलिक यांना याबाबत भूमिका स्पष्ट करण्याचे निर्देश देत सुनावणी २७ सप्टेंबर रोजी निश्चित केली.