वाहन चोरी केलीच केली अन् मुलीलाही पळवले; अल्पवयीन मुलांचे कारनामे, पाच वाहनचोरीच्या घटना उघड

अल्पवयीन मुले विविध गुन्ह्यात सहभागी होताना दिसून येत आहेत. याच मालिकेत सक्करदरा पोलिसांनी दोन अल्पवयीन मुलांसह असलेल्या मुलीला ताब्यात घेतले. त्यांची विचारपूस केली असता त्यांनी पाच दुचाकी (Vehicle Theft) चोरल्याचे पुढे आले.

  नागपूर : अल्पवयीन मुले विविध गुन्ह्यात सहभागी होताना दिसून येत आहेत. याच मालिकेत सक्करदरा पोलिसांनी दोन अल्पवयीन मुलांसह असलेल्या मुलीला ताब्यात घेतले. त्यांची विचारपूस केली असता त्यांनी पाच दुचाकी (Vehicle Theft) चोरल्याचे पुढे आले. सोबत असलेल्या मुलीलाही त्यांनी पळवून आणल्याही निष्पन्न झाले. या प्रकरणी पोलिसांनी मुलीला संबंधित पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. सक्करदरा पोलिसांनी ही कावाई केली.

  सक्करदारा पोलिसांचे पथक हे पेट्रोलिंग करत असताना क्वार्टर ते क्रीडा चौक दरम्यान, एका ऍक्टिव्हा वाहनावर दोन मुले व एक मुलगी बसून जात होते. या वाहनाचे रजिस्ट्रेशन नसल्याचा पोलिसांना संशय आला. पोलिसांनी त्यांना थांबण्याचा इशारा केला असता ते पळून गेले. पोलिसांनी त्यांचा पाठलाग केला आणि त्यांना ताब्यात घेतले.

  पोलिसांनी त्यांना टिव्हीएस स्टार सिटी (एम.एच 40ए. एन. 6515) व मुलीस विना रजिस्ट्रेशन असलेली अॅक्टिव्हा 6 जी मोपेड बाबत कागदपत्रे मागितली. परंतु, ते उडवाउडवीची उत्तरे देत होते. त्यामुळे त्यांना सक्करदरा पोलिस ठाण्यात देण्यात आले. अधिक तपास केला असता ही वाहनं चोरीची असून त्यासंदर्भात गुन्हा देखील दाखल असल्याचे समजले.

  आरोपी अल्पवयीन असल्याची बाब समोर

  पोलिसांनी त्यांची सखोल विचारपूस केली असता आरोपी हे अल्पवयीन असल्याचे समजले. यानंतर चौकशीत त्यांनी वाहन सक्करदरा, अजनी, ईमामवाडा हद्दीतून चोरल्याची कबुली दिली. या प्रकरणी पोलिसांनी

  अल्पवयीन मुलांच्या ताब्यातून 1 लाख 45 हजार रुपये किंमतीची एकूण पाच वाहने जप्त केली. यातील अल्पवयीन मुलीला इमामवाडा पोलीस ठाणे हद्दीतून पळवून आणल्याचे मुलांनी सांगितले. याप्रकरणी ईमावाडा येथे गुन्हा दाखल आहे.