भररस्त्यात वाढदिवस साजरा करतानाच राडा; कोयते हातात घेऊन दहशतीचा प्रयत्न

भररस्त्यात वाढदिवस साजरा करताना झालेल्या किरकोळ वादानंतर अल्पवयीन मुले व टोळक्याने दहशत माजवित कोयते हवेत नाचवून वाहनांवर दगडफेक केल्याचा प्रकार उत्तमनगर (Crime in Pune) परिसरात घडला. यामुळे नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले होते.

    पुणे : भररस्त्यात वाढदिवस साजरा करताना झालेल्या किरकोळ वादानंतर अल्पवयीन मुले व टोळक्याने दहशत माजवित कोयते हवेत नाचवून वाहनांवर दगडफेक केल्याचा प्रकार उत्तमनगर (Crime in Pune) परिसरात घडला. यामुळे नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले होते.

    याप्रकरणी सचिन दिलीप राठोड (वय २४, रा. कोंढवे धावडे) याला अटक केली आहे. तर साथीदार शुभम संदीप ठाकूर (वय १८) यांच्यासह आठ ते दहा जणांवर उत्तमनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

    याबाबत रोहिम गणेश मौर्य (वय २०, रा. कोपरे गाव) यांनी तक्रार दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुभम ठाकूर याचा येथील शिवशक्ती चौकात रस्त्यावरच वाढदिवस साजरा केला जात होता. यावेळी रोहिम मौर्यशी वाद झाला. यावेळी टोळक्याने कोयते नाचवून दहशत माजविली.

    तसेच, नागरिकांना शिवीगाळ करुन रस्त्याच्या कडेला लावलेल्या कार व दुचाकींची तोडफोड करत तूफान गोंधळ माजवला. याप्रकरणाचा अधिक तपास सहायक निरीक्षक रोकडे करत आहेत.