प्रतिकात्मक फोटो
प्रतिकात्मक फोटो

अकरावीत शिक्षण घेत असताना मुलीचे एका मुलाशी प्रेमसंबंध जुळले. त्या मुलीशी मुलाच्या घरच्या मंडळीने लग्न लावून दिले. यातच ती गरोदर राहिली. 3 नोव्हेंबर रोजी तिची गंगाबाई रुग्णालयात प्रसूती झाली.

    देवरी : अकरावीत शिक्षण घेत असताना मुलीचे एका मुलाशी प्रेमसंबंध जुळले. त्या मुलीशी मुलाच्या घरच्या मंडळीने लग्न लावून दिले. यातच ती गरोदर (Minor Girl Pregnant) राहिली. 3 नोव्हेंबर रोजी तिची गंगाबाई रुग्णालयात प्रसूती झाली. पण जेव्हा डॉक्टरांनी कागदपत्रांची मागणी केली तेव्हा हा सर्व प्रकार समोर आला. त्यानंतर पोलिसांनी तातडीने धाव घेत संबंधितांवर गुन्हा दाखल केला.

    पोलिसांनी बालविवाह प्रतिबंधक कायद्यान्वये डवकी येथील माधोराव पृथ्वीराज मरस्कोल्हे (वय 23) याच्याविरोधात गुन्हा दाखल केला. देवरी तालुक्यातील डवकी येथील 17 वर्षीय अल्पवयीन मुलगी अकरावीमध्ये शिकत असताना तिचे डवकी येथीलच माधोराव मरस्कोल्हे या तरुणाशी जानेवारी 2023 मध्ये प्रेमसंबंध जुळले. तेव्हापासून ते आठ ते पंधरा दिवसांच्या अंतरातून एकमेकांना भेटत होते. याची माहिती मुलीच्या घरच्या मंडळीला झाली. त्यावरून त्यांनी त्या मुलीला शिवीगाळ करत मारहण केली. त्या रागातून ती मुलगी माधोराव मरस्कोल्हे याच्या घरी गेली. त्याच्यासोबत राहू लागली.

    माधोरावच्या घरच्या मंडळीने तिला सून म्हणून स्वीकारले. फेब्रुवारी महिन्यात तिला गर्भधारणा झाल्यामुळे 17 मार्च रोजी तिचे माधोरावसोबत लग्न लावून दिले. 3 नोव्हेंबर रोजी तिला गोंदिया येथील गंगाबाई रुग्णालयात प्रसूती झाली. यात तिने मुलाला जन्म दिला. मात्र, तिचे वय कमी असल्याचे माहीत असून, देखील तिच्याशी लग्न केल्यामुळे बाल विवाह प्रतिबंध कायद्यान्वये देवरी पोलिसांनी आरोपी माधोराव मरस्कोल्हे याच्याविरोधात गुन्हा दाखल केला.