घराशेजारी राहणाऱ्या अल्पवयीन मुलीला फूस लावून नेले पळवून अन् नंतर केला अत्याचार; विवाहित आरोपीला अटक

राजुरा शहरातील एका अल्पवयीन मुलीला शेजारच्या एका विवाहित तरुणाने फूस लावून पळवून नेले आणि तिच्यावर अत्याचार केला. या प्रकरणी मुलीच्या आईच्या तक्रारीवरून राजुरा पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून आरोपीला अटक केली आहे.

    राजुरा : राजुरा शहरातील एका अल्पवयीन मुलीला शेजारच्या एका विवाहित तरुणाने फूस लावून पळवून नेले आणि तिच्यावर अत्याचार केला. या प्रकरणी मुलीच्या आईच्या तक्रारीवरून राजुरा पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून आरोपीला अटक केली आहे. न्यायालयाने या तरुणाची न्यायालयीन कस्टडीत रवानगी केली आहे.

    30 आक्टोंबरला ही अल्पवयीन मुलगी गायब झाली होती. तिच्या आईने या प्रकरणी राजुरा पोलिसांत तक्रार दाखल केली. दरम्यान दोन-तीन दिवसांनी ती मुलगी परत आली आणि तीने आईला आपबिती सांगितली. या प्रकरणाची माहिती मुलीच्या आईने पोलिसांना दिली. मुलीची वैद्यकीय तपासणी करण्यात आली.

    राजुरा पोलिसांनी कलम 376, अट्रोसिटी, पॉस्को या कलमानुसार गुन्हा दाखल केला असून आरोपी सैय्यद अशफाक, वय 26 वर्ष याला अटक केली आहे. आरोपीला न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. अधिक तपास उपविभागीय पोलिस अधिकारी करत आहेत.