
एका अल्पवयीन मुलीला रस्त्यात अडवून तिला मारहाण करणे तसेच व्हिडिओ तयार करून तिचा विनयभंग केल्याप्रकरणी (Girl Molestation) सोमवारी जिल्हा व सत्र न्यायालयाने एका आरोपीला पोक्सो कायद्याअंतर्गत दोषी ठरवत त्याला तीन वर्षे सश्रम कारावास आणि एक हजार रुपयांचा (Nagpur Crime) दंड ठोठावला आहे. न्या. ओ. पी. जयस्वाल यांनी हा निर्णय दिला.
नागपूर : एका अल्पवयीन मुलीला रस्त्यात अडवून तिला मारहाण करणे तसेच व्हिडिओ तयार करून तिचा विनयभंग केल्याप्रकरणी (Girl Molestation) सोमवारी जिल्हा व सत्र न्यायालयाने एका आरोपीला पोक्सो कायद्याअंतर्गत दोषी ठरवत त्याला तीन वर्षे सश्रम कारावास आणि एक हजार रुपयाचा (Nagpur Crime) दंड ठोठावला आहे. न्या. ओ. पी. जयस्वाल यांनी हा निर्णय दिला.
आशिष घरडे असे या आरोपीचे नाव आहे. कळमना पोलिस स्टेशनच्या हद्दीमध्ये 17 एप्रिल 2022 रोजी ही घटना घडली. आरोपी व अल्पवयीन मुलगी यांचे एकमेकांवर प्रेम होते. पीडित मुलीच्या घरी किराणा दुकान असल्याने आरोपी तिथे माल टाकायला यायचा. अशातच त्यांची ओळख झाली व मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले. त्यामुळे 2019 मध्ये आरोपी व पीडित मुलगी घरून पळून गेले होते. त्यावेळी ती मुलगी दहाव्या वर्गात शिकत होती. याबाबत पीडितेच्या कुटुंबीयांनी पोलिसात तक्रार दाखल केली होती. दोन दिवसानंतर दोघेही नागपूरला परत आले. त्यावेळी पीडितेच्या कुटुंबीयांनी तिला समजावून सांगितले. त्यामुळे तिने त्याच्यासोबत असलेले सर्व संबंध तोडले. तसेच दीड वर्षांपासून त्यांचे एकमेकांसोबत बोलणे बंद होते.
घटनेच्या दिवशी पीडित मुलगी आपल्या मैत्रीणीसोबत जवळच्या फोटो स्टुडिओमध्ये फोटो काढण्यासाठी चालली होती. इतक्यात आरोपी आपल्या मित्रासोबत गाडीने तिथे आला व त्याने तिची अडवणूक केली. तसेच तिचा विनयभंग केला, मारहाण केली व मित्राच्या मदतीने या सर्व प्रकाराचा मोबाईलवर व्हिडिओ तयार केला. तिने आराडा-ओरड केल्याने आरोपीने तिथून पळ काढला. परंतु, त्यानंतर तिला फोन करून त्याने 10 हजार रुपयांची मागणी केली. अन्यथा हा व्हिडिओ व्हायरल करून बदनामी करण्याची धमकी दिली.