परळीत अल्पवयीन शालेय मुलीला फूस लावून पळवले; संभाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

बीडच्या परळी येथील गरीब शेतकऱ्याची अल्पवयीन मुलगी शाळेत आली असताना औष्णिक विद्युत केंद्र कर्मचारी वसाहतीच्या गेट समोरून एका अज्ञात आरोपीने तिला फूस लावून पळवल्याची खळबळजनक घटना घडली. दरम्यान या प्रकरणी संभाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    बीड : बीडच्या परळी येथील गरीब शेतकऱ्याची अल्पवयीन मुलगी शाळेत आली असताना औष्णिक विद्युत केंद्र कर्मचारी वसाहतीच्या गेट समोरून एका अज्ञात आरोपीने तिला फूस लावून पळवल्याची खळबळजनक घटना घडली. दरम्यान या प्रकरणी संभाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    मिळालेल्या माहितीनुसार, दिनांक ३० मार्च २०२४ रोजी सकाळी सव्वा सात ते दहा वाजण्याच्या दरम्यान औष्णिक विद्युत केंद्र कर्मचारी वसाहती मधील न्यू हायस्कूल या शाळेत शिकत असलेल्या एका तेरा वर्षीय अल्पवयीन मुलीस अज्ञाताने फुस लावून पळवल्याची घटना घडली.

    याप्रकरणी मुलीचे वडील यशवंत वसंतराव गुट्टे (वय ४२ राहणार धर्मापुरी रोड रेल्वे गेट) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार संभाजीनगर पोलीस ठाण्यात आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला असून, अधिक तपास पोलीस निरीक्षक उस्मान शेख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अनील शिंदे हे करीत आहेत.

    दरम्यान या घटनेने पालक वर्गात चिंतेचे वातावरण पसरले असून, मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. पोलिसांनी किमान शाळा भरताना आणि सुटताना शालेय परिसरात फिरती पेट्रोलिंग ठेवावी अशी मागणी चिंताग्रस्त पालक वर्गातून होत आहे.