A minor who steals a car for fun in Pune is jailed; Police seized 10 bikes, tractors

  पुणे : पुणे शहरासारख्या सांस्कृतिक शहरात अल्पवयीनांकडून गुन्हेगारी वाढत चालली आहे. मौजमजा करण्यासाठी शहराच्या विविध भागातून दुचाकी चोरणार्‍या अल्पवयीन तरुणाला वारजे माळवाडी पोलिसांनी ताब्यात घेतले. या मुलाकडून तब्बल ११ गुन्ह्यांचा छडा लागला असून, त्याच्याकडून ५ लाख १५ हजार रुपये किमतीच्या १० दुचाकी, एक ट्रॅक्टर जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी वारजे माळवाडी पोलिसांनी १७ वर्षीय मुलाला ताब्यात घेतले आहे.

  सापळा रचून अल्पवयीन ताब्यात

  ही कारवाई वारजे माळवाडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक मनोज शेडगे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) निळकंठ जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक रामेश्वर पार्वे व त्यांच्या पथकाने केली. शहरातील वाढत्या वाहन चोरीच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर वारजे पोलीस हद्दीत गस्तीवर होते. या दरम्यान कॅनॉल रोड, खानमस्जिदजवळ एक जण संशयितरित्या थांबला असून, त्याच्याकडे एक लाल रंगाची दुचाकी असल्याची माहिती पोलिसांच्या पथकाला मिळाली. त्यानुसार सापळा रचून अल्पवयीन तरुणाला ताब्यात घेतले.

  वारजे जकातनाका भागातून चोरी

  त्याच्याकडे गाडीच्या कागदपत्रांबाबत विचारणा केली असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. त्याचेवर पोलिसांना संशय आल्याने अधिक चौकशीसाठी त्याला वारजे पोलीस स्टेशन येथे आणण्यात आले. तपासात त्याच्याकडील दुचाकी ही वारजे जकातनाका भागातून त्याने चोरी केली असल्याचे निष्पन्न झाले. पोलिसी खाक्या दाखविताच त्याने शहर परिसरातून आणखी दुचाकी चोरल्याचे कबूल केले. सदरच्या गाड्या ह्या फक्त मौजमजेसाठी चोरी केली असल्याचे त्याने सांगितले. त्याच्याकडून चोरीच्या १० दुचाकी, १ कॅप्टन कंपनीचा ट्रॅक्टर जप्त करण्यात येऊन एकूण ११ वाहन चोरीचे गुन्हे उघडकीस आलेले आहेत.

  पुण्यात इतर गुन्ह्यांच्या संख्येतसुद्धा वाढ

  Shaadi.com वर स्थळ पाहताय! सावधान, शादी डॉटकॉमवर नोंदणी केल्यानंतर एका भामट्याने पुण्यातील आयटी अभियंत्या तरुणीला लग्नाच्या आमिष दाखवत ४० लाख ५० हजारांचा गंडा घातला आहे. या प्रकरणी ३३ वर्षीय तरुणीने मुंढवा पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. यानुसार पोलिसांनी माहिती तंत्रज्ञान कायद्यानुसार राजेश शर्मा, बँक खातेधारक व्यक्तींविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा नोंदवला आहे.

  खराडी भागात आयटी कंपनीत कामाला असलेली तरुणीची फसवणूक

  पोलिसांच्या माहितीनुसार, तरुणी खराडी भागातील नामांकित आयटी कंपनीत नोकरी करते. ती मुंढवा येथील केशवनगर येथे राहते. विवाहसाठी तरुणीने शादी डॉटकॉम संकेतस्थळावर नोंदणी केली होती. तेथे राजेश शर्मा नावाच्या व्यक्तीसोबत ओळ‌ख झाली. ओळखीनंतर ते बोलत असत. शर्माने तरुणीला तो विदेशात असल्याचे सांगितले. पुढे संपर्क वाढल्यानंतर शर्मा आणि तरुणी व्हिडीओकॉलद्वारे बोलत होते. एकेदिवशी शर्माने भारतात येऊन तरुणीसोबत लग्न करायचे आहे. तसेच, घर खरेदी करून व्यवसाय करायचा आहे असे सांगितले.