विनोद तावडेंवर एक नवी आणि मोठी जबाबदारी ;  भाजपचा मोठा निर्णय

2019 च्या विधानसभा निवडणुकीमध्ये विनोद तावडे यांना तिकीट मिळालं नाही, यानंतर त्यांना राष्ट्रीय राजकारणात स्थान मिळालं. विनोद तावडे यांना दिल्लीमध्ये भाजपचं राष्ट्रीय सरचिटणीस करण्यात आलं. आता पुन्हा आगामी लोकसभा निवडणुकीसाठी (Lok Sabha Election 2024) भाजपकडून खास रणनिती तयार करण्यात आली आहे.

    2019 च्या विधानसभा निवडणुकीमध्ये विनोद तावडे यांना तिकीट मिळालं नाही, यानंतर त्यांना राष्ट्रीय राजकारणात स्थान मिळालं. विनोद तावडे यांना दिल्लीमध्ये भाजपचं राष्ट्रीय सरचिटणीस करण्यात आलं. आता पुन्हा आगामी लोकसभा निवडणुकीसाठी (Lok Sabha Election 2024) भाजपकडून खास रणनिती तयार करण्यात आली आहे. निवडणुकीच्या तोंडावर पक्षात इनकमिंग होतं, त्यासाठी केंद्रीय भाजपनं मोठा निर्णय घेतला आहे. दुसऱ्या पक्षातून भाजपमध्ये येणाऱ्या नेत्यांबाबत निर्णय घेण्यासाठी एक समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीचं संयोजकपद महाराष्ट्रातील विनोद तावडे (vinod tawde) यांच्याकडे सोपवण्यात आले आहे. दुसऱ्या पक्षातून येणाऱ्या राजकीय नेत्यांबाबत ही समिती  निर्णय घेणार आहे. या समितीचे संयोजकपद विनोद तावडे यांच्याकडे देण्यात आले आहे.
    विनोद तावडेंकडे जबाबदारी 
    लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपकडून महत्त्वाची समिती स्थापन करण्यात आली आहे. आयारामांना आळा घालण्यासाठी केंद्रीय भाजपनं मोठा निर्णय घेतला आहे. समितीचे संयोजक विनोद तावडेंना केलं आहे. दुसऱ्या पक्षातून येणाऱ्या राजकीय नेत्यांबाबत समिती  निर्णय घेणार आहे. समितीच्या परवानगी नंतरच बाहेरच्या पक्षाचे नेता भाजप पक्ष जॉईन करणार आहे.