अभिषेक घोसाळकरांच्या प्रकरणाला नवे वळण, उद्धव ठाकरेंनी व्यक्त केली शंका

शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज पत्रकार परिषद घेऊन, या सर्व हत्याकांडाबाबत शंका उपस्थित करण्यात आली आहे.

  माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर (Abhishek Ghosalkar) यांची हत्या फेसबुक लाईव्ह चालू असताना करण्यात आली आणि राजकीय वर्तुळामध्ये खळबळ माजली. घोसाळकर यांच्या हत्येनंतर आता राजकीय वर्तुळातून विविध प्रतिक्रिया उमटत आहेत. शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी या हत्येबाबत शंका व्यक्त केल्या जात आहेत, अभिषेक घोसाळकर आणि त्यांची हत्या करणारा मॉरिस नोरोन्हा (Morris Noronha) याला सुपारी देऊन हत्या करण्यात आली का? असे प्रश्न उपस्थित केले जात आहेत. अभिषेक घोषाल यांच्या हत्येनंतर त्यांचा देह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला होता.

  अभिषेक घोसाळकर यांचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट (Abhishek Ghosalkar postmortem report) अर्थात शवविच्छेदन अहवाल समोर आला आहे. यामधून अनेक गोष्टी समोर आल्या आहेत. घोसाळकर यांच्यावर मॉरिस नोरोन्हाने (Morris Noronha) समोरुन पाच गोळ्या झाडल्या, त्यापैकी तीन गोळ्या घोसाळकरांना लागल्या आहेत असे सांगितले जात होते. मात्र शवविच्छेदन अहवालात घोसाळकरांना तीन नाही तर चार गोळ्या चार गोळ्या लागल्याचं समोर आले आहे.

  अभिषेक घोसाळकरांच्या मृत्यूचं नेमकं कारण काय?
  अभिषेक घोसाळकरांच्या देह शवविच्छेदनासाठी नेण्यात आला होता. त्याच्या शवविच्छेदन अहवालानुसार, अभिषेक घोसाळकर यांचा मृत्यू हा अतिरक्तस्त्राव आणि हॅमरेज शॉक यामुळे झाल्याचं नमूद करण्यात आलं आहे. जे. जे. रुग्णालयातील शवविच्छेदनाच्या प्राथमिक अहवालात तशी नोंद आहे. अभिषेक घोसाळकर यांना या हल्ल्यामध्ये चार गोळ्या लागल्याचे समोर आले आहे. फेसबुक लाईव्ह सुरु करून अभिषेक घोसाळकर यांच्यावर मॉरिस नोरोन्हाने समोरून गोळ्या झाडल्या. हल्ला झाल्यानंतर अभिषेक घोसाळकर हे गंभीर जखमी झाले होते. जखमी झाले होते. घोसाळकरांना उपचारासाठी बोरिवलीतील रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र त्यादरम्यानच त्यांचा मृत्यू झाला. अतिरक्तस्त्राव झाला त्यामुळे अभिषेक घोसाळकरांचा मृत्यू झाला असं शवविच्छेदन अहवालात नमूद आहे.

  घोसाळकरांच्या हत्येनंतर उद्धव ठाकरेंची प्रतिक्रिया
  शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज पत्रकार परिषद घेऊन, या सर्व हत्याकांडाबाबत शंका उपस्थित करण्यात आली आहे. मॉरिसने फेसबुक लाईव्ह सुरु असताना, अभिषेक घोसाळकरवरगोळ्या झाडल्याचं सांगितलं जातं. मात्र, फेसबुक लाईव्हमध्ये कॅमेऱ्याच्या मागून गोळ्या झाडणारी व्यक्ती नेमकी कोण होती, हे समजू शकलेले नाही. मॉरिस नोरोन्हाला अभिषेक घोसाळकर (Abhishek Ghosalkar) यांच्यावर सूड उगवायचा होता मग त्याने स्वत:ही आत्महत्या का केली? हा एकूणच प्रकार संशयास्पद असल्याचे वक्तव्य उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी केले.