भुसावळच्या राजकारणात नवा ट्विस्ट; कोणाला संधी तर कोणाची गुल होणार दांडी

भुसावळ तालुक्यात यावर्षी एका गटाची वाढ झाली आहे. त्यामुळे अनेक इच्छुकांच्या अपेक्षा वाढल्या होत्या. मात्र आगामी निवडणुकीसाठी तालुक्यात एक गट अनुसूचित जाती व एक गट अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी आरक्षित झाला आहे . तर दोन गट जनरल असले तरी तेही महिला प्रवर्गासाठी आरक्षित आहे त्यामुळे इच्छुकांना चांगलाच धक्का बसला आहे.

    भुसावळ : तालुक्यात यावर्षी एका गटाची वाढ झाली आहे. त्यामुळे अनेक इच्छुकांच्या अपेक्षा वाढल्या होत्या. मात्र आगामी निवडणुकीसाठी तालुक्यात एक गट अनुसूचित जाती व एक गट अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी आरक्षित झाला आहे . तर दोन गट जनरल असले तरी तेही महिला प्रवर्गासाठी आरक्षित आहे त्यामुळे इच्छुकांना चांगलाच धक्का बसला आहे. त्यामुळे बहुतेक इच्छुकांना पंचायत समितीकडे मोर्चा वळवावा लागणार आहे. तर काही इच्छुकांना महिलांना पुढे करावे लागणार आहे.

    भुसावळ तालुक्यात गेल्या पंचवार्षिक निवडणुकीत मध्ये जिल्हा परिषदेचे तीन गट होते. यावेळेस चार गटांची निर्मिती झाली आहे. चारही गट वेगवेगळ्या प्रवर्गासाठी आरक्षित झाल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे युवक जिल्हाध्यक्ष रवींद्र पाटील, जिल्हा परिषद माजी सदस्य विश्वनाथ पाटील, पंचायत समितीचे माजी सभापती सुनील महाजन, यांच्यासह अनेकांना आरक्षणाचा फटका बसला आहे. त्यामुळे यातील बहुतेकांना पंचायत समिती निवडणुकीकडे मोर्चा वळवावा लागणार आहे. किंवा महिलांना संधी द्यावी लागणार आहे .

    गेल्या पंचवार्षिक निवडणुकीत मध्ये कुऱ्हे ( पानाचे )गट अनुसूचित जाती महिला प्रवर्ग, तळवेल गट अनुसूचित जमाती महिला प्रवर्ग व साकेगाव – कंडारी गट जनरल उमेदवारांसाठी होते. साकेगाव – कंडारी गटातून रवींद्र पाटील ( राष्ट्रवादी ) यांनी अवघ्या दोनशे ते अडीचशे मतांनी विजय प्राप्त केला होता. कुऱ्हे ( पानाचे ) गटातून पल्लवी सावकारे ( भाजपा ) तब्बल 6 हजार मतांच्या मताधिक्क्याने विजयी झाल्या होत्या. तळवेल गटातून सरला कोळी ( शिवसेना ) या निवडून आल्या होत्या. मात्र त्यांचे प्रमाणपत्र अवैध ठरवण्यात आले होते. त्यामुळे त्यांना अनेक वर्ष न्यायालयातच घिरट्या घालव्या लागल्या होता.

    आगामी पंचवार्षिक निवडणुकीसाठी कंडारी गट जनरल महिला, निंभोरा बुद्रुक गट जनरल महिला दळवेल गट अनुसूचित जाती व कुऱ्हे ( पानाचे ) गट हा प्रथमच अनुसूचित जमाती या प्रवर्गासाठी आरक्षित झाला आहे. कुऱ्हे ( पानाचे ) गट यापूर्वी 19 80 साली अनुसूचित जमातीसाठी आरक्षित झाला होता. त्यावेळी वराडसिम ( जोगलखोरी ) येथील वना ठाकरे हे आरक्षित गटातून निवडून आले होते. त्यावेळेपासून हा गट वेगवेगळ्या प्रवर्गासाठी आरक्षित करण्यात आला होता . गेल्या पंचवार्षिक निवडणुकीतही हा गट अनुसूचित जाती महिला प्रवर्गासाठी आरक्षित झाला होता.