बैलगाडा घाटात वृद्धांचे पैसे चोरणाऱ्यास अटक

कारेगाव (ता. आंबेगाव) येथील बैलगाडा घाटात बैलगाडे पाहण्यासाठी गेलेल्या ज्येष्ठ व्यक्तीच्या खिशातील ३० हजार रुपये चोरल्याप्रकरणी किसन आण्णा गायकवाड (वय ५० रा. देहूफाटा झोपडपट्टी, ता.हवेली) याला मंचर पोलिसांनी अटक केली.

    मंचर : कारेगाव (ता. आंबेगाव) येथील बैलगाडा घाटात बैलगाडे पाहण्यासाठी गेलेल्या ज्येष्ठ व्यक्तीच्या खिशातील ३० हजार रुपये चोरल्याप्रकरणी किसन आण्णा गायकवाड (वय ५० रा. देहूफाटा झोपडपट्टी, ता.हवेली) याला मंचर पोलिसांनी अटक केली.

    याबाबतची फिर्याद तुकाराम जयराम कराळे (वय ६०, रा.कारेगाव, ता. आंबेगाव) यांनी मंचर पोलीस ठाण्यात दिली. कारेगावच्या यात्रेत बैलगाडे पाहण्यासाठी कराळे दुपारी १ वाजेच्या दरम्यान घाटात गेले होते. त्यांच्या खिशात विविध कार्यकारी सोसायटी कारेगाव येथे भरण्यासाठी ठेवलेली तीस हजार रुपये रक्कम होती. ती रक्कम किसन गायकवाड हा चोरत असताना त्याला पकडले.

    मंचर पोलिसांनी त्याला अटक केली असून पुढील तपास पोलिस हवालदार नाडेकर करत आहे.