बॅडमिंटन खेळताना हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याने व्यक्तीचा मृत्यू!

परभणी शहरातील तापडिया ऑटो कन्सल्टन्सीचे मालक सचिन तापडिया हे काल सकाळी बॅडमिंटन कोर्टवर नेहमीप्रमाणे बॅडमिंटन खेळले. खेळुन झाल्यानंतर ते कोर्टवर असलेल्या खुर्चीत बसले. मात्र त्याच वेळी त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि ते खाली कोसळले.

    परभणी : बॅडमिंटन (Badminton) खेळत असताना हृदयविकाराचा (Heart attack) तीव्र झटका आल्याने एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याची खळबळजनक घटना परभणीत उघडकीस आली आहे. सचिन तापडिया असं या व्यक्तीचं नाव असून ते 44 वर्षाचे होते. परभणी शहरातील नावाजलेले उद्योजक असल्याची माहिती समोर येत आहे.

    परभणी शहरातील तापडिया ऑटो कन्सल्टन्सीचे मालक सचिन तापडिया हे काल सकाळी बॅडमिंटन कोर्टवर नेहमीप्रमाणे बॅडमिंटन खेळले. त्यांचा एक राऊंड झाला आणि ते तिथेच कोर्टवर असलेल्या खुर्चीत बसले. मात्र त्याच वेळी त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि ते खाली कोसळले. यावेळी तिथे उपस्थित असलेल्या त्यांच्या इतर सहकाऱ्यांनी त्यांना उचललं आणि तात्काळ रुग्णालयात दाखल केलं, मात्र तोपर्यंत त्यांचा मृत्यू झाला होता. ही सर्व दृश्य सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाली आहेत. गुरुवारी सकाळची ही घटना असल्याची माहिती आहे.