कजाकिस्तानच्या व्यक्तीचा साताऱ्यातील हॉटेलमध्ये मृत्यू

कजाकिस्तान या देशातून आलेल्या एका व्यक्तीचा साताऱ्यातील एका प्रसिद्ध हॉटेलमध्ये मृत्यू झाला रविवारी संध्याकाळी ही घटना समोर आली. आलेकक्षी पोडवालणी (वय ३९ रा. करांगडा, कजाकिस्तान) असे मृत व्यक्तीचे नाव आहे.

    सातारा : कजाकिस्तान या देशातून आलेल्या एका व्यक्तीचा साताऱ्यातील एका प्रसिद्ध हॉटेलमध्ये मृत्यू झाला रविवारी संध्याकाळी ही घटना समोर आली. आलेकक्षी पोडवालणी (वय ३९ रा. करांगडा, कजाकिस्तान) असे मृत व्यक्तीचे नाव आहे.

    आलेकक्षा कजाकिस्तानमधील एका कंपनीत काम करत होते. साताऱ्यातील एका कंपनीच्या इन्स्पेक्शनसाठी ते १० ऑक्टोबरला साताऱ्यात आले होते. पुणे बेंगलोर महामार्ग लगत असलेला एका हॉटेलमध्ये त्यांचा मुक्काम होता. दरम्यान रविवारी दुपारी हॉटेलचा दरवाजा ते उघडत नव्हते. त्यांचा फोनही बंद होता. त्यामुळे कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी दुसऱ्या चावीने दरवाजा उघडला असता ते बेडवर मृतावस्थेत आढळून आले. त्यांचा मृतदेह जिल्हा शासकीय रुग्णालयात नेण्यात आला. कागदपत्रांचे सोपस्कार पूर्ण झाल्यानंतर मृतदेह पुणे येथील ससून रुग्णालयात नेण्यात आला. त्यांचा मृत्यू नेमका कशामुळे झाला हे अद्याप समोर आलेले नाही. कजाकिस्तानच्या प्रशासनाशी पोलीस निरीक्षक महेंद्र जगताप यांनी संपर्क साधला असून मृतदेह नेण्यासाठी नातेवाईक रवाना झाले आहेत.