दागिने पॉलिश करून देतो म्हणाला अन्…

पिंपळगाव घोडे (ता.आंबेगाव) येथील नवाबाई किसन लाडके यांचे दागिने दोघा अज्ञातांनी हातचलाखी करून ६० हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने लंपास केले आहे. याबाबत दोन अनोळखी व्यक्तींविरूद्ध फिर्याद घोडेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  

    मंचर : पिंपळगाव घोडे (ता.आंबेगाव) येथील नवाबाई किसन लाडके यांचे दागिने दोघा अज्ञातांनी हातचलाखी करून ६० हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने लंपास केले आहे. याबाबत दोन अनोळखी व्यक्तींविरूद्ध फिर्याद घोडेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी नवाबाई लाडके (वय ५०, रा. पिंपळगाव घोडे) यांच्या घरी दोन अनोळखी इसम आले. त्यांनी घरी दागिन्यांना पॉलिश करून देतो असे सांगून दागिने कुकरमध्ये हळदीच्या पाण्यात ठेवण्यास सांगितले. त्यानंतर हातचलाखी करून दागिने चोरून नेले आहेत.

    यामध्ये ४० हजार रुपये किमतीचे सोन्याचे मनी मंगळसूत्र आणि २० हजार रुपये किमतीच्या कानातील २ सोन्याच्या कुड्या असा एकूण ६० हजार रुपये किंमतीच्या सोन्याच्या दागिन्यांचा समावेश होता. पुढील तपास घोडेगाव पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार वायाळ करत आहे .