परराज्यातून येऊन पुण्यात दुचाकी चोरणाऱ्यास ठोकल्या बेड्या ; बिबवेवाडी पोलिसांनी सापळा रचून घेतले ताब्यात

मजुरीसाठी पुण्यात आला पण वाहन बनल्याची एक घटना पुणे पोलिसांनी उघडकीस आणली असून, या वाहन चोरट्याला बिबवेवाडी पोलिसांनी सापळा रचून अटक केली. त्याच्याकडून चार दुचाकी जप्त केल्या आहेत. इम्रान सिराजउद्दीन अन्सारी (वय २९, सध्या रा. कोंढवा, मूळ रा. खजोरी, जि. देवघर, झारखंड) असे अटक केलेल्याचे नाव आहे.

    पुणे : मजुरीसाठी पुण्यात आला पण वाहन बनल्याची एक घटना पुणे पोलिसांनी उघडकीस आणली असून, या वाहन चोरट्याला बिबवेवाडी पोलिसांनी सापळा रचून अटक केली. त्याच्याकडून चार दुचाकी जप्त केल्या आहेत. इम्रान सिराजउद्दीन अन्सारी (वय २९, सध्या रा. कोंढवा, मूळ रा. खजोरी, जि. देवघर, झारखंड) असे अटक केलेल्याचे नाव आहे.

    ही कारवाई वरिष्ठ निरीक्षक संगीता जाधव, सहायक निरीक्षक प्रवीण काळुखे, संतोष जाधव व त्यांच्या पथकाने केली आहे. अन्सारी पुण्यात मजुरीसाठी आला होता. पण, त्याने दुचाकी चोरीचा गोरख धंदा सुरू केला.

    बिबवेवाडी भागातून त्याने नुकतीच एक दुचाकी चोरली होती. पोलीस पथक बिबवेवाडीत गस्त घालत होते. त्यावेळी पथकाने अन्सारीला संशयावरून पकडले. तपासात त्याने बिबवेवाडी परिसरातून ३ व वारजेतून १ दुचाकी चोरल्याचे सांगितले. तत्पुर्वी शहरातील वाढत्या गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी हद्दीत गस्त घालत होते. यादरम्यान, इम्रान अन्सारी याच्याबाबत माहिती मिळाली. त्यानूसार, वरिष्ठ निरीक्षक संगीता जाधव, सहायक निरीक्षक प्रवीण काळुखे, संतोष जाधव व त्यांच्या पथकाने केली आहे.