कर्तव्यबजावत असतानाच पोलीस हवालदाराला मृत्यूने गाठले

नवी मुंबई पोलीस आयुक्तालय अंतर्गत पोलीस ठाण्यात कार्यरत कर्मचाऱ्यांच्या रजा नामंजूर करण्यात आल्या आहेत.

    पनवेल, ग्रामीण – तुर्भे पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचार्‍याचा कर्तव्यावर असतानाच हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी (ता.28) घडली. प्रसाद सावंत असे मयत कर्मचाऱ्याचे नाव असून ते 44 वर्षाचे होते. मूळचे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रहिवाशी असलेले सावंत आपल्या पंधरा वर्षीय मुला सोबत डोंबिवली येथे राहत होते. गुरुवारी नवी मुंबई पोलीस आयुक्तालया अंतर्गत येणाऱ्या तुर्भे पोलीस ठाणे हद्दीतील महापे येथील बिट नं 1 येथे रात्रपाळी दरम्यान पहाटे सहा दरम्यान सावंत यांना अस्वस्थ वाटू लागले. त्यांना नजदिकच्या नवी मुंबई पालिकेच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. सकाळी साडेसहाच्या दरम्यान हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाले असल्याचे निदान डॉक्टरांनी केले.नवीन वर्षाच्या स्वागताच्या पार्शवभूमीवर

    नवी मुंबई पोलीस आयुक्तालय अंतर्गत पोलीस ठाण्यात कार्यरत कर्मचाऱ्यांच्या रजा नामंजूर करण्यात आल्या आहेत. महत्वाचे म्हणजे 24 डिसेंबर पासून अतिरिक्त बंदोबस्त जाहीर करण्यात आला असल्याने 24 डिसेंबर पासून रजा नामंजूर केल्या जाणे अपेक्षित होते. मात्र 1 डिसेंबर पासूनच अनेक कर्मचाऱ्याच्या हक्काच्या रजा नामंजूर केल्या गेल्याने पोलीस कर्मचारी तणावात आहेत.अशातच कर्तव्य बाजावताना सावंत यांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याने कर्मचारी हळहळ व्यक्त करत आहेत.या बाबत नवी मुंबई पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांच्याशी भ्रमणध्वनी द्वारे या बाबत माहिती घेण्यासाठी संपर्क साधला असता ते उपलब्ध होऊ शकले नाहीत.