घटस्फोटित महिलेला लग्नाचे आमिष दाखवून सातत्याने अत्याचार; पोलिस कर्मचारीच निघाला आरोपी…

एका घटस्फोटित महिलेवर सतत अत्याचार (Rape on Woman) केल्याप्रकरणी सोमवारी आयुक्तांच्या आदेशाने कोतवाली पोलिसांनी पोलिस कर्मचाऱ्याविरुद्ध गुन्हा नोंदवून त्याला ताब्यात घेतले.

    अमरावती : एका घटस्फोटित महिलेवर सतत अत्याचार (Rape on Woman) केल्याप्रकरणी सोमवारी आयुक्तांच्या आदेशाने कोतवाली पोलिसांनी पोलिस कर्मचाऱ्याविरुद्ध गुन्हा नोंदवून त्याला ताब्यात घेतले. पोलिस कर्मचाऱ्याच्या अत्याचाराला (Police Arrested) कंटाळून त्या पीडित महिलेने सरळ आयुक्तालयात जाऊन वरिष्ठ अधिकाऱ्यांना घडलेला सर्व प्रकार सांगितला. त्यानंतर पोलिसांनी अजय सरोदे (Ajay Sarode) या पोलिस कर्मचाऱ्याला ताब्यात घेतले.

    याबाबत महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार, फारकतीची केस वर्धा कोर्टात असल्यामुळे तिला नेहमी वर्धा कोर्टात तारखेवर जावे लागते. वर्धा येथून अमरावती बसस्थानकावरून घरी जाण्याकरिता ऑटोची वाट पाहत बसस्थानकाबाहेर उभी असताना पोलिस कर्मचारी अजय सरोदे हा महिलेला पाहून थांबला आणि तिला घरी सोडून देतो, म्हणून दुचाकीवर बसविले. येथूनच त्यांची ओळख झाली. त्यावेळी त्याने महिलेचा मोबाइल नंबर घेतला. तेव्हापासून तो सतत महिलेला फोन करून बोलत होता. महिलासुद्धा त्याच्या सोबत बोलत होती.

    लग्नाचे आमिष दाखवून अत्याचार

    लग्नाचे आमिष देऊन महिलेवर अत्याचार केला. तसेच सतत मानसिक त्रास देत होता. त्याच्या त्रासाला कंटाळून पीडिताने सोमवारी दुपारी पोलिस आयुक्त गाठले आणि घडलेला सर्व प्रकार वरिष्ठ अधिकाऱ्यांना सांगितला. लगेच लग्नाचे आमिष पीडितेच्या बयाणानुसार, कोतवाली पोलिसांनी अजय सरोदेला ताब्यात घेतले.