सराईत गुन्हेगारांकडून राजकीय पक्षाच्या कार्यालयात घुसून गोळीबार; तीन सराईत गुन्हेगारांवर खूनाचा प्रयत्नाचा गुन्हा नोंद

शहर सतत कोयतेधारी अन् पिस्तूल धाऱ्यांच्या दहशतीने धगधगत असून, ऐनगर्दीच्या वेळीच सय्यद नगर भागात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या अल्पसंख्याक विभागाचे जिल्हा प्रमुख इम्तियाय जलिल शेख यांच्या कार्यालयात घुसून गुंडांनी गोळीबार केल्याची घटना गुरुवारी सायंकाळी घडली.

    पुणे : शहर सतत कोयतेधारी अन् पिस्तूल धाऱ्यांच्या दहशतीने धगधगत असून, ऐनगर्दीच्या वेळीच सय्यद नगर भागात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या अल्पसंख्याक विभागाचे जिल्हा प्रमुख इम्तियाय जलिल शेख यांच्या कार्यालयात घुसून गुंडांनी गोळीबार केल्याची घटना गुरुवारी सायंकाळी घडली. या थराराने परिसरात भितीचे वातावरण पसरले असून, या घटनेने एकच खळबळ उडाली आहे.

    या प्रकरणी अतिक इकबाल शेख (३७), सादिक शेख (२५) आणि हुसेन मुस्तफा कादरी (सर्व रा. सय्यद नगर, हडपसर) या सराईत गुन्हेगारांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या अल्पसंख्याक विभागाचे जिल्हा प्रमुख इम्तियाय शेख यांनी वानवडी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.

    पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, इम्तियाज हे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या अल्पसंख्याक विभागाचे जिल्हा प्रमुख आहेत. २७ डिसेंबर रोजी शेख यांचा भाऊ इम्रान आणि आरोपी सादिक शेख यांची किरकोळ कारणावरून भांडणे झाली होती. या भांडणाचा बदला घेण्यासाठी तिघे गुरुवारी तेथे आले. पिस्तुल घेऊन ते शेख यांच्या पहिल्या मजल्यावरील कार्यालयात शिरले. त्यांनी शेख यांच्या बंद असलेल्या कार्यालयावर लाथा मारून आत घुसण्याचा प्रयत्न केला. परंतु ते अयशस्वी ठरले नाही. त्यांनी खाली जाऊन गाजबजलेल्या परिसरात हवेत गोळीबार करून दहशत पसरविण्याचा प्रयत्न केला.

    इतकेच नाही त्यांनी मुख्य रस्त्यावर येऊन अतिकने हातात पिस्तुल घेऊन हवेत गोळीबार करतानाच ‘यहा के भाई लोग हम है, हमारे नाद को लगे तो जान से हात धो बैठोगे,’ असे म्हणत दहशत निर्माण केली. एकीकडे कोयत्याचा वार आणि गोळीचा बार पुणेकरांना सातत्याने अनुभवास मिळत असल्याने नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण पसरत आहे.