संग्रहित फोटो
संग्रहित फोटो

ब्रह्मपुरी शहरातील बुरड मोहल्यात मुख्य रस्त्याला लागून एक सार्वजनिक विहीर (Public Well) होती. त्या विहिरीवर एका व्यक्तीने स्लॅप टाकल्याने ती विहीर दिसेनासी झालेली असल्याने येथील नगरपरिषदेची विहीर चोरीला गेल्याचे दिसतंय.

    ब्रह्मपुरी : ब्रह्मपुरी शहरातील बुरड मोहल्यात मुख्य रस्त्याला लागून एक सार्वजनिक विहीर (Public Well) होती. त्या विहिरीवर एका व्यक्तीने स्लॅप टाकल्याने ती विहीर दिसेनासी झालेली असल्याने येथील नगरपरिषदेची विहीर चोरीला गेल्याचे दिसतंय.

    रेल्वे टेशन रोडवरील बुरड मोहल्यात रस्त्याच्या बाजूला खूप जुनी विहीर होती. ती विहीर त्याकाळी या भागातील नागरिकांची तसेच ये-जा करणाऱ्यांची तहान भागवण्यासाठी वापरली जात होती. मात्र, बदलत्या काळानुसार लोकांचा कल बदलला आणि पर्वाच्या घरी नपचे नळ कनेक्शन पोहचले व विहिरींकडे दुर्लक्ष होत गेले. याच संधीचा फायदा घेत येथील एका व्यावसायिकाच्या घरासमोर ही विहीर होती. त्याने व्यावसायिक गाड्यांचा बांधकाम सुरू केले.

    या दरम्यान या विहिरीवर स्लॅप टाकले. त्यामुळे ही विहीर अप्रत्यक्षपणे चोरीचा गेली असून, या प्रकाराकडे नगरपरिषदच्या कर्मचारी व अधिकाऱ्यांची लक्ष गेले नाही हा कुतूहलच आहे. वास्तविक, नगरपरिषदेच्या रेकॉर्डवर सार्वजनिक कामांची नोंद असते. मात्र, ही विहीर चोरी गेली असताना हे कर्मचारी, अधिकारी मूग गिळून गप्प बसले आहेत.