लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपाची आज आढावा बैठक; जागा वाटपावरुन महायुतीत ठिणगी?

आगामी २०२४ लोकसभा निवडणुकीसाठी भाजपाने कंबर कसली आहे. मागील दीड-दोन वर्षापासून त्यांची तयारी सुरु आहे. पण आता ४८ जागा आणि तीन पक्ष त्यामुळं जागावाटपाचे महायुतीसमोर मोठे आव्हान आहे. कारण सध्या भाजपाकडे सर्वाधिक २२ खासदार आहेत. तर शिंदे गटाकडे १३ आणि अजित पवार गटामध्ये २ खासदार आहेत.

    मुंबई – आगामी २०२४ लोकसभा निवडणुकीच्या धरतीवर आत्तापासून अनेक पक्षांनी मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. मविआची देखील महिन्यात बैठक पार पडल्यानंतर आता भाजपाची आज आढावा बैठक होणार आहे. मुंबई भाजपाची बैठक लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपची मुंबईत महत्वाची बैठक होणार आहे. यावेळी भाजपाचे सर्व आमदार आणि खासदार उपस्थित राहतील. मुंबई तसेच महाराष्ट्रातील लोकसभा मतदारसंघाचा यावेळी आढावा घेण्यात येणार आहे. तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार आहेत. (A review meeting of the Grand Alliance in the wake of the Lok Sabha elections; Will there be a decision on seat allocation)

    जागा वाटपावर निर्णय होणार?

    दरम्यान, महायुतीत आता अजित पवार गट सहभागी झाल्यामुळं युतीचे महायुतीत रुपांतर झाले आहे. तसेच भाजपा व शिंदे गटाला आणखी मजबूती मिळली आहे. दरम्यान, आज भाजपाच्या बैठकीत मुंबई तसेच महाराष्ट्रातील लोकसभा मतदारसंघाचा यावेळी आढावा घेण्यात येणार आहे. त्याबरोबर जागा वाटपाबाबत देखील चर्चा होणार आहे.

    जागा वाटपावरुन महायुतीत वाद?

    आगामी २०२४ लोकसभा निवडणुकीसाठी भाजपाने कंबर कसली आहे. मागील दीड-दोन वर्षापासून त्यांची तयारी सुरु आहे. पण आता ४८ जागा आणि तीन पक्ष त्यामुळं जागावाटपाचे महायुतीसमोर मोठे आव्हान आहे. कारण सध्या भाजपाकडे सर्वाधिक २२ खासदार आहेत. तर शिंदे गटाकडे १३ आणि अजित पवार गटामध्ये २ खासदार आहेत. मात्र मिळालेल्या माहितीनुसार सर्वांधिक जागा ह्या भाजपाच्या पारड्यात जाणार, त्यानंतर दोन नंबरला शिंदे गट आणि मग अजित पवार असं जागा वाटपाचे समीकरण असल्याचं बोललं जातंय. पण जागा वाटपावरुन महायुतीत वादाची ठिणगी पडणार का? याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे.