A review of the security arrangements in Maval Constituency by Election Officer Surendra Navale in the background of the polling

  वडगाव मावळ : मावळ लोकसभा मतदार संघाच्या निवडणुकीसाठी सोमवार १३ मे रोजी होणाऱ्या मतदानाच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टीने तसेच प्रत्यक्ष मतदानावेळी आवश्यक पोलीस यंत्रणेच्या आराखड्याबाबत मावळ लोकसभा मतदारसंघाचे सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी सुरेंद्र नवले अतिरिक्त सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार विक्रम देशमुख यांनी आढावा घेतला.

  मावळ मतदारसंघात होणार 13 मे रोजी मतदान

  सार्वत्रिक निवडणूक २०२४ लोकसभा ३३ करिता २०४ मावळ विधानसभा मतदारसंघ अंतर्गत दि १३ मे रोजी होणाऱ्या प्रत्यक्ष मतदानाच्या पार्श्वभूमीवर मावळ लोकसभा मतदार संघातील मतदान केंद्रावर नियुक्त करण्यात येणाऱ्या पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांच्या जिल्हा सुरक्षा नियोजन आराखड्याविषयी आढावा घेण्याच्या दृष्टीने तळेगाव दाभाडे येथील नूतन महाराष्ट्र इंजिनिअरिंग कॉलेज येथील कार्यालयात विशेष बैठक संपन्न झाली.

  या बैठकीस देहूरोड विभागाचे एसीपी घेवारे साहेब, तसेच देहूरोड पोलीस स्टेशनचे पो.नि वाघमारे,तळेगाव पोलीस स्टेशन पो.नि पाटील, शिरगाव पोलीस स्टेशन पो.नि सूर्यवंशी, वडगाव पोलीस स्टेशन पो.नि कदम, तळेगाव एमआयडीसी पोलीस स्टेशन पो.नि बांगर. तसेच इतर अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.

  वाढत्या उष्णतेच्या बाबतीत सूचना

  या बैठकी दरम्यान अधिकारी व कर्मचारी यांना प्रत्यक्ष मतदानाच्या दिवशी पोलीस अधिकाऱ्यांना गडबड गोंधळ न होणे कामी सुरक्षेबाबतचे नियोजन व नियंत्रण तसेच प्रशासकीय अधिकारी व कर्मचारी यांना मतदान केंद्रावरील कामकाजाच्या अनुषंगाने व वाढत्या उष्णतेच्या बाबतीत सूचना देण्यात आल्या.