
जिल्ह्यात प्रत्येक गावात बचतगटाची दुध डेअरी सुरू करण्याचे नियोजन करण्यात येत आहे. दुग्धोत्पादनाबरोबर कुकटपालन सुरू करण्यास मोठा वाव आहे. त्या दृष्टीने नियोजन करा, असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी केले.
सोलापूर: जिल्ह्यात प्रत्येक गावात बचतगटाची दुध डेअरी सुरू करण्याचे नियोजन करण्यात येत आहे. दुग्धोत्पादनाबरोबर कुकटपालन सुरू करण्यास मोठा वाव आहे. त्या दृष्टीने नियोजन करा, असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी केले.
जिल्हा परिषदेच्या ग्रामीण विकास यंत्रणा विभागात आज उमेद अभियान अतंर्गत जिल्हा स्तर व तालुका स्तरावरील कर्मचारी यांची बैठक आयोजित करणेत आली होती. या आढावा बैठकीत सिईओ दिलीप स्वामी बोलत होते. या प्रसंगी प्रभारी प्रकल्प संचालक उमेशचंद्र कुलकर्णी, बंॅक आॅफ इंडियाचे जिल्हा बॅक समन्वयक प्रशांत नाशिककर, उमेदचे अभियान व्यवस्थापक सचिन चवरे, उपस्थित होते.
स्वामी म्हणाले, प्रत्येक गावात महिलांची बचतगटाची डेअरी सुरू करण्यात येणार आहे. प्रत्येक किमान एक डेअरी या प्रमाणे नियोजन करा. त्याना खेळते भांडवल द्या. दुध संस्था बरोबर समन्वय साधा. दुध पंढरी व इतर दुध संस्था बरोबर करार करता येतील. त्या दृष्टीने बचतगटांना मदत करता येईल. पशुसंवर्धन विभागाची मदत घेऊन कुक्कटपालन करणेस मोठा वाव आहे. प्रास्ताविक प्रकल्प संचालक उमेशचंद्र कुलकर्णी यांनी केले.
महिलांचे जीवनमान उंचावावे
जीवनावश्यक वस्तूशी संबंधित पदार्थाचे उत्पादन, त्याचे मार्केटिंग, पॅकींग यामध्ये लक्ष द्यावे, तरच यामध्ये मोठी साखळी निर्माण करता येईल. उमेद अभियानात दिलेले उदिष्ट पूर्ण करून जरी राज्यात टाॅपला असलो तरी आपण प्रत्यक्षात महिलांचे जीवनमान उंचावण्याच्या दृष्ट्रीने नियोजन करा, असेही स्वामी यांनी सांगितले.