
मार्केट यार्ड (Market Yard) परिसरातील आंबेडकरनगर (Ambedkarnagar) भागात भरदिवसा दोन टोळ्यांमध्ये तुंबळ हाणामारी झाल्याची घटना घडली. या दोन्हींमधून एकमेकांवर तलवार व कोयत्याने वार करुन खूनाचा प्रयत्न झाला. सकाळीच हा प्रकार घडल्याने तणावपुर्ण वातावरण निर्माण झाले होते.
पुणे : मार्केट यार्ड (Market Yard) परिसरातील आंबेडकरनगर (Ambedkarnagar) भागात भरदिवसा दोन टोळ्यांमध्ये तुंबळ हाणामारी झाल्याची घटना घडली. या दोन्हींमधून एकमेकांवर तलवार व कोयत्याने वार करुन खूनाचा प्रयत्न झाला. सकाळीच हा प्रकार घडल्याने तणावपुर्ण वातावरण निर्माण झाले होते. पोलिसांनी दोन्ही गटातील एकूण ८ जणांना अटक केली आहे. या प्रकरणी मार्केटयार्ड पोलीस ठाण्यात परस्परविरोधी गुन्हे दाखल केले आहेत.
अनिलसिंग ऊर्फ बु सिंकदरसिंग टाक (वय २१, रा. गल्ली नं. १ आंबेडकरनगर) याने दिलेल्या तक्रारीनुसार पोलिसांनी गुन्हा दाखल केला. त्यानुसार दत्ता भिसे (वय २९), नितीन भिसे (वय १९), विजय भिसे (वय २४) यांना अटक केली आहे. तर, दत्ता भिसे यांच्या तक्रारीनुसार पिंटुसिंग दुधानी (वय ३८), अनिलसिंग टाक (वय २१), सिंकदरसिंग टाक (वय ४०) व रोहीत दुधानी (वय १९) यांना अटक केली आहे. रविवारी सकाळी ११ च्या सुमारास घडला आहे.
जीवे मारण्याचा प्रयत्न केला
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन्ही गट एकाच परिसरात रहायला आहेत. दत्ता भिसेचा पुतण्या आकाश भिसे अनिलसिंग यांच्या घरासमोरुन भरधाव वेगाने दुचाकीने जात होता. त्यावेळी त्यांनी त्याला दुचाकी हळू चालवत नेत जा असे सांगितले. याचा राग मनात धरुन दत्ता भिसे व इतर ८ जण हातात कोयते व काठ्या घेऊन आले. त्यांनी अनिलसिंग यांच्यावर कोयत्याने व काठीने मारहाण करुन दहशत निर्माण केली. तर, त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केला.
परिसरातील वातावरण काही काळ तणावपुर्ण
तर, दत्ता भिसे यांच्या तक्रारीनुसार, त्यांचा पुतण्या आकाश भिसेला या आरोपींनी घरासमोरुन भरधाव दुचाकी नेल्यावरून मारहाण केली. त्याबाबत आकाश हा त्याच्या वडिलासोबत मार्केटयार्ड पोलीस ठाण्यात जात होता. त्यांच्या घरासमोरुन जात असताना अनिलसिंगने शिवीगाळ करुन तलवारीने हल्ला करुन जीवे मारण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, सकाळीच झालेल्या या दोन गटाताली वादांमुळे परिसरात चांगलीच दहशत निर्माण झाली होती. परिसरातील वातावरण काही काळ तणावपुर्ण झाले होते.