मेळावा मंचावर संजय राऊत यांच्यासाठी खुर्ची राखीव, सेना पाठिशी असल्याचा संदेश

ठाकरे म्हणाले, व्यासपीठावर मी एक रिकामी खुर्ची पाहिली. ती संजय राऊत यांची आहे. मी आत्ताच खूलासा करतो. संजय राऊत हे मोडेन पण वाकणार नाही, या निश्चयाने लढत आहेत. लढाईत ते सोबत आहेत. सर्वात आघाडीवर ते आहेत. व्यासपीठावर आल्यानंतर वडील जागेवर आहेत का नाही हे मी पाहिले.

    मुंबई: शिवसेनेच्या आजच्या गटप्रमुखांच्या मेळाव्याच्या स्टेजवर खासदार संजय राऊत यांच्यासाठी एक खुर्ची आरक्षित ठेवण्यात आली आहे. शिवसेनेच्या गटप्रमुखांचा मेळावा सुरु असून यामध्ये उद्धव ठाकरे संबोधित करत आहेत. शिंदे गटाच्या बंडखोरीनंतर आणि राज्यातील सत्तांतरानंतर हा पहिलाच मेळावा आहे.

    ठाकरे म्हणाले, व्यासपीठावर मी एक रिकामी खुर्ची पाहिली. ती संजय राऊत यांची आहे. मी आत्ताच खूलासा करतो. संजय राऊत हे मोडेन पण वाकणार नाही, या निश्चयाने लढत आहेत. लढाईत ते सोबत आहेत. सर्वात आघाडीवर ते आहेत. व्यासपीठावर आल्यानंतर वडील जागेवर आहेत का नाही हे मी पाहिले.

    शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्यावर ईडीने कारवाई केली असून ते सध्या तुरुंगात आहेत. पण आजच्या मेळाव्याच्या स्टेजवर त्यांच्यासाठी एक खुर्ची राखीव ठेवण्यात आली आहे. शिवसेना संजय राऊत यांच्या पाठिशी ठाम असल्याचा संदेश यामागे देण्यात आला आहे. संजय राऊत हे आमचे नेते आहेत, त्यांचा सन्मान ठेवण्यासाठी आम्ही ही खुर्ची रिकामी ठेवली आहे असं शिवसेनेच्या वतीनं सांगण्यात आलं आहे.