
नवरात्रौत्सवामुळे नारळांना मागणी वाढली आहे. तर, दुसऱ्या बाजूला मार्केट यार्ड भुसार बाजारात नारळाचा तुटवडा आहे. नेहमीच्या तुलनेत 70 टक्केच आवक होत आहे. दसऱ्याला मागणी वाढणार आहे. त्यामुळे भाववाढ होण्याचा अंदाज आहे. गणपती उत्सव काळात नारळाला तुलनेने चांगली आवक होत होती. मात्र, आता आवक घटली आहे.
पुणे : नवरात्रौत्सवामुळे नारळांना मागणी वाढली आहे. तर, दुसऱ्या बाजूला मार्केट यार्ड भुसार बाजारात नारळाचा तुटवडा आहे. नेहमीच्या तुलनेत 70 टक्केच आवक होत आहे. दसऱ्याला मागणी वाढणार आहे. त्यामुळे भाववाढ होण्याचा अंदाज आहे. गणपती उत्सव काळात नारळाला तुलनेने चांगली आवक होत होती. मात्र, आता आवक घटली आहे.
तामीळनाडूनंतर आंध्र प्रदेश आणि कर्नाटक येथून आवक नारळाची होते. दि. 1 ऑक्टोबरपासून तामिळनाडू येथे जोरात पाऊस सुरू आहे. त्याचा परिणाम काढणीवर झाला आहे. त्यातच तेथे मजूर उपलब्ध होत नाहीत. कर्नाटक आणि आंध्र प्रदेशमध्येही उत्पादन काहीसे कमी झाले आहे. वाहतूक खर्च वाढवण्यात आला आहे. या सर्व कारणामुळे पुण्यात नारळाची आवक घटली आहे. येथील भुसार बाजारात दररोज दीड ते 2 लाख नारळांची आवक होत आहे. ही नेहमीच्या तुलनेत 70 टक्के असल्याचे व्यापारी दीपक बोरा यांनी सांगितले.
नवरात्रौत्सवामुळे नारळाला देशभरातून मागणी आहे. घरगुती ग्राहक, दुकानदार यांच्याकडून मागणी आहेच. मात्र, या कालावधीत हॉटेलिंग व्यवसाय तेजीत असतो. त्यामुळे मागणी वाढली आहे. परिणामी, मागील 15 दिवसांत घाऊक बाजारात प्रत्येक नारळाच्या भावात 1 ते दीड रुपयांनी वाढ झाली आहे.
– दीपक बोरा, नारळांचे व्यापारी, मार्केट यार्ड