संजय राऊतांचे मविआ सरकारमधून बाहेर पडण्याचे संकेत, पृथ्वीराज चव्हाण म्हणाले…

एकनाथ शिंदे सुरतनंतर आता जवळपास 44 आमदारांना घेऊन गुहावटीत येथे थांबले आहेत. सरकारमधून बाहेर पडण्यास तयार पण मुंबईत येऊन चर्चा करा, तुम्हा स्वत:ला शिवसैनिक समजता तिकडे बसून पत्र व्यवहार करता त्यापेक्षा हिकडे या, बसून चर्चा करुया असे खळबळजनक वक्तव्य संजय राऊत यांनी केले आहे. त्यांच्या या वक्तव्यानंतर राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी प्रतिक्रिया दिली.

    मुंबई : सध्या राज्यात राजकीय भूकंप होण्याची शक्यता आहे. राज्यातील राजकीय हालचालीना वेग आला आहे. शिवसेनेचे नेते व मंत्री एकनाथ शिंदे सुरतनंतर आता जवळपास 44 आमदारांना घेऊन गुहावटीत येथे थांबले आहेत. सरकारमधून बाहेर पडण्यास तयार पण मुंबईत येऊन चर्चा करा, तुम्हा स्वत:ला शिवसैनिक समजता तिकडे बसून पत्र व्यवहार करता त्यापेक्षा हिकडे या, बसून चर्चा करुया असे खळबळजनक वक्तव्य संजय राऊत यांनी केले आहे. त्यांच्या या वक्तव्यानंतर राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी प्रतिक्रिया दिली.

    पृथ्वीराज चव्हाण नेमकं काय म्हणाले?

    मुख्यमंत्री २४ तासांत त्यांच्या भूमिकेबाबत असा यू-टर्न घेतील का, याबाबत मला साशंकता आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या फेसबुकवरील कालच्या भाषणात ते असं काहीही बोलले नाहीत. त्यामुळे मला याबाबत आश्चर्य वाटत असल्याचे पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटले.

    पृथ्वीराज चव्हाण यांनी आपली ही भूमिका वैयक्तिक आहे, पक्षाची भूमिका मला नाही, असे स्पष्ट केले. मला समजत नाही की, शिवसेना महाविकास आघाडी सरकारमधून बाहेर पडणार म्हणजे ते भाजपसोबत जाणार आहेत का? गुवाहाटीत शिवसेनेचे ४५ आमदार जमल्याचे फोटो पाहून शिवसेना दबावाखाली ही भूमिका घेत आहेत का? महाविकास आघाडीतून बाहेर पडून उद्धव ठाकरे भाजपसोबत यायला तयार आहेत का? शिवसेना पुन्हा दुय्यम भूमिका स्वीकारायला तयार आहे का?, अशा प्रश्नांची सरबत्ती पृथ्वीराच चव्हाण यांनी केली.

    दरम्यान कालच्या भाषणात उद्धवजी असे काही बोलले नाहीत. ते काही आमदारांच्या दबावाखाली असा निर्णय घेतील, असे मला वाटत नसल्याचेही पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटले. शेवटी हा शिवसेनेचा अंतर्गत विषय आहे. याबाबत निर्णय शिवसेनेनेच घ्यायचा आहे, आमच्या हातात काहीच नाही. काँग्रेस पक्षात याबाबत अद्याप चर्चा झालेली नाही, असेही पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितले.