A sketch of the third absconding accused in the gang atrocity case is prepared

एसआयटीने पीडितेच्या माहितीवरुन तिसऱ्या संशयित आरोपीचा स्केच तयार केला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार संबंधिताचे वय ३० ते ४० वर्ष असून दिसायला सावळया रंगाचा व मध्यम बांधा, केस काळे, हलकी दाढ़ी, डाव्या हातात जर्मनचा कड़ा, डाव्या हाताच्या बोटामध्ये दोन-तीन अंगठ्या, पांढरा रंगाचा शर्ट, काळ्या रंगाची फुलपँट घटनेवेळीस त्यांनी परिधान केली होती.

    गोंदिया : भंडारा – गोंदिया जिल्ह्यात (Bhandara – Gondia District) एका महिलेवर झालेल्या अत्याचार प्रकरणी भंडारा पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. तिसरा संशयिताचा शोध सुरु असून पोलिसांनी आता या प्रकरणात नागरिकांची मदत घेण्याचे निश्चित केले आहे. त्यानुसार पोलिसांनी तिस-या संशयित आरोपीचे स्केच तयार करुन ते जनतेपर्यंत पोहचविले आहे.

    पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित महिलेवर दोन वेगवेगळ्या ठिकाणी अत्याचार झाला. या प्रकरणी लुखा उर्फ अमित सार्वे व मोहम्मद एजाज अंसारी याला अटक करण्यात आले आहे. या दोन्ही संशयित आरोपींना गोंदिया जिल्ह्याच्या (Gondia district) गोरेगाव पोलिसांकडे (Goregaon Police) सुपुर्द करण्यात आले आहे. दरम्यान या प्रकरणातील तिसरा संशयित आरोपी शोधण्यासाठी एसआयटीने तपासाची चक्रे (investigation by SIT ) फिरवली आहेत.

    एसआयटीने पीडितेच्या माहितीवरुन तिसऱ्या संशयित आरोपीचा स्केच तयार केला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार संबंधिताचे वय ३० ते ४० वर्ष असून दिसायला सावळया रंगाचा व मध्यम बांधा, केस काळे, हलकी दाढ़ी, डाव्या हातात जर्मनचा कड़ा, डाव्या हाताच्या बोटामध्ये दोन-तीन अंगठ्या, पांढरा रंगाचा शर्ट, काळ्या रंगाची फुलपँट घटनेवेळीस त्यांनी परिधान केली होती. त्यानुसर तयार स्केच करण्यात आले असून कुणाला आढळल्यास माहिती देण्याचे आवाहन गोंदिया स्थानिक गुन्हे शाखेचे (Gondia Local Crime Branch) पोलीस निरिक्षक बबन आव्हाड (Police Inspector Baban Awad) यांनी आवाहन केले आहे.