भरधाव ट्रकची दुचाकीला धडक; भीषण अपघातात एकाच परिवारातील तिघे जागीच ठार

चंद्रपूरसाठी आजचा दिवस दुर्दैवी ठरला. ट्रकनं धडक दिल्यानं झालेल्या अपघातात एकाच परिवारातील तिघांचा मृत्यू झाला. यात तीन वर्षाच्या मुलीचा समावेश आहे. ज्या ट्रकच्या धडकेत तिघे ठार झाले त्याच ट्रकने पुढे जाऊन दोघांना परत धडक दिली. त्यामध्ये आणखी दोघे गंभीरित्या जखमी झाले आहेत.

    चंद्रपूर : चंद्रपूरसाठी आजचा दिवस दुर्दैवी ठरला. ट्रकनं धडक दिल्यानं झालेल्या अपघातात एकाच परिवारातील तिघांचा मृत्यू झाला. यात तीन वर्षाच्या मुलीचा समावेश आहे. ज्या ट्रकच्या धडकेत तिघे ठार झाले त्याच ट्रकने पुढे जाऊन दोघांना परत धडक दिली. त्यामध्ये आणखी दोघे गंभीरित्या जखमी झाले आहेत. उपचारासाठी त्यांना जिल्हा रुग्णालयात नेण्यात आले आहे. ही घटना जिल्हातील राजुरा तालुक्यात येणाऱ्या धोपटाला पेट्रोल पंप जवळ रात्री आठ वाजता घडली.

    निलेश वैद्य (३२ वर्ष) रुपाली वैद्य (२६ वर्ष), मधू वैद्य (३ वर्ष) अशी मृत्यू झालेल्यांची नावे आहेत. प्रशाद टगराफ (३३ वर्ष) व प्रसाद राजाबाई टगराफ (४० वर्ष) हे दोघे जखमी झाले आहेत.घटनेची माहिती मिळताच नागरिकांनी घटनास्थळी गर्दी केली होती.राजुरा पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत गर्दी नियंत्रणात आणली.

    मिळालेल्या माहितीनुसार, राजुरा तालुक्यातील धोपटाळा येथील गुरुदेव नगर येथे वास्तव्यास असलेले निलेश वैद्य हे आपल्या पत्नी आणि मुलीसह बाहेरगावी कामानिमित्त गेले होते. सायंकाळी काम आटपून घरी परत येत असताना घरापासून अवघ्या एक किलोमीटर अंतरावर असलेल्या पेट्रोल पंप जवळ राजुरा येथून सास्तीकडे जाणाऱ्या ट्रकने मोटरसायकला धडक दिली. धडक एवढी जोरदार होती की त्यात वैद्य परिवाराचा घटनास्थळीच मृत्यू झाला.

    याच ट्रकने पुढे जाऊन दोन मोटार सायकलस्वारांना धडक दिली. यात रामपुर येथील दोघेही जखमी झालेत. जखमींना राजुरा उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. जखमीची प्रकृती गंभीर असल्याने पुढील उपचारासाठी चंद्रपूर येथे पाठविण्यात आले आहे.

    अपघाताची माहिती मिळतात नागरिकांनी घटनास्थळी गर्दी केली. जमावाने ट्रकचालकाला पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले आहे. घटनेची माहिती राजुरा पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळ गाठून गर्दीला नियंत्रण केले. या प्रकरणी पुढील तपास राजुरा पोलिस करीत आहे.