सावत्र आईकडून 10 वर्षांच्या मुलाचा खून; झोपेत असताना उचलून हौदात बुडवलं अन्…

सावत्र आईने कौटुंबिक वादातून 10 वर्षांच्या मुलाची हत्या केली. जेव्हा हा मुलगा झोपेत होता तेव्हा त्याला उचलून नेऊन शेजारील बांधकामावरील पाण्याच्या हौदात बुडवून ठार मारले. याबाबतची माहिती पोलिसांना मिळताच पोलिसांनी निर्दयी महिलेला अटक केली.

    धाराशिव : सावत्र आईने कौटुंबिक वादातून 10 वर्षांच्या मुलाची हत्या केली. जेव्हा हा मुलगा झोपेत होता तेव्हा त्याला उचलून नेऊन शेजारील बांधकामावरील पाण्याच्या हौदात बुडवून ठार मारले. याबाबतची माहिती पोलिसांना मिळताच पोलिसांनी निर्दयी महिलेला अटक केली.

    शिवमल्हार दयानंद घोडके (वय 10 वर्षे रा. नळदुर्ग, ता. तुळजापूर जि. धाराशिव) असे खून झालेल्या मुलाचे नाव आहे. तर सुंदरबाई दयानंद घोडके असे आरोपी महिलेचे नाव आहे. शिवमल्हार हा 28 मार्च रोजी रात्री घरासमोरील ज्योर्तिलिंग ज्वेलर्स दुकानासमोर त्याच्या वडिलांसह झोपला होता. सकाळी झोपलेल्या ठिकाणी तो दिसला नसल्याने त्याच्या वडिलांनी व नातेवाईकांनी त्याचा शोध घेतला.

    तेव्हा घराजवळील बांधकाम चालू असलेल्या हौदात त्याचा मृतदेह मिळून आला. पोलिसांनी याप्रकरणाचा अधिक तपास केला असता त्यांना ही हत्या असल्याचे लक्षात आले. त्यानंतर त्यांनी आरोपी महिलेला ताब्यात घेऊन तिच्याकडे गुन्ह्यासंदर्भाने चौकशी केली. त्यावेळी तिने सदर गुन्हा केल्याची कबुली दिली.