जातेगावला आढळला पट्टेरी कवड्या साप

जातेगाव बुद्रुक (ता. शिरुर)  येथे कवड्या जातीचा पट्टेरी साप आढळून आला असून या सापाला सर्पमित्राकडून जीवदान देत निसर्गाच्या सानिध्यात मुक्त करण्यात आले आहे. जातेगाव बुद्रुक  येथील ग्रामपंचायत सदस्य निलेश उमाप यांना रात्रीच्या सुमारास त्यांच्या घराच्या खिडकीजवळ एक साप असल्याचे दिसून आले.

    शिक्रापूर :  जातेगाव बुद्रुक (ता. शिरुर)  येथे कवड्या जातीचा पट्टेरी (striped snake )साप आढळून आला असून या सापाला सर्पमित्राकडून जीवदान देत निसर्गाच्या सानिध्यात मुक्त करण्यात आले आहे. जातेगाव बुद्रुक  येथील ग्रामपंचायत सदस्य निलेश उमाप यांना रात्रीच्या सुमारास त्यांच्या घराच्या खिडकीजवळ एक साप असल्याचे दिसून आले. त्यांनी याबाबतची माहिती सर्पमित्र शेरखान शेख यांना दिली.  शेख यांनी तातडीने तेथे ठिकाणी धाव घेत पाहणी केली असता त्यांना कवड्या जातीचा आगळावेगळा असा कवड्या जातीचा साप असल्याचे दिसून आला.  शेख यांनी या सापाला पकडला. त्यानंतर  शिरुर वनविभागाचे वनरक्षक प्रमोद पाटील व बबन दहातोंडे यांना माहिती देत सदर सापाला निसर्गाच्या सानिध्यात मुक्त केले.