विद्यार्थाला शिक्षिकेकडून बेदम मारहाण; पुण्यातील धक्कादायक प्रकार आला समोर

पुण्यातील मध्यवर्ती भागामध्ये असणाऱ्या नामांकित शाळेमध्ये विद्यार्थाला बेदम मारण्यात आले आहे

    पुणे – पुण्यातील एका धक्कादायक घटनेचा व्हिडिओ समोर आला आहे. पुण्यातील मध्यवर्ती भागामध्ये असणाऱ्या नामांकित शाळेमध्ये विद्यार्थाला बेदम मारण्यात आले आहे. नववीच्या वर्गामध्ये शिकत असणाऱ्या विद्यार्थाला संतापलेल्या शिक्षकेने बेदम मारहाण केली आहे. याप्रकरणी विश्रामबाग पोलीस ठाण्यात शिक्षिकेविरूद्ध अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    सदर प्रकरणामध्ये विद्यार्थाच्या आईने तक्रार दाखल केली आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार महिलेचा मुलगा नववीत शिकत आहे. दुपारी काही मुले वर्गात गोंधळ घालत होती. त्यावेळी शिक्षिका वर्गात आल्या. मुले बाकावर जाऊन बसली. तक्रारदार महिलेचा मुलगा बाकावर नसल्याचे आढळून आले नाही. त्यानंतर शिक्षिकेने मुलाला फळ्याजवळ नेऊन बेदम मारहाण केली.

    वर्गातील एका विद्यार्थाने या घटनेचा व्हिडिओ शूट केला. सदर व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. अनेकांनी यावर तीव्र शब्दांमध्ये नाराजी व्यक्त करत कमेंट्स केल्या आहेत. व्हिडिओ व्हायरल झाला असल्याचे समजताच मुलाच्या आईने विश्रामबाग पोलीस ठाण्यात धाव घेतली. तिने पोलिसांकडे तक्रार दिली. मुलाच्या आईने दिलेल्या तक्रारीनुसार पोलिसांनी शिक्षिकेविरुद्ध अदखलपात्र गुन्ह्याची नोंद केली आहे, अशी माहिती विश्रामबाग पोलिसांनी दिली.