तब्बल 17 टन गॅस घेऊन जाणारा टँकर उड्डाणपुलावर झाला लीक; वाहतुकीला खोळंबा

चिकलठाणा एमआयडीसीतील एचपी कंपनीच्या प्लांटकडे जाणारे गॅस टँकर सिडको उड्डाणपुलाच्या कठड्यावर चढला. या अपघातामुळे टँकरच्या खालील वॉल्व्ह लिकेज होऊन गॅस गळती सुरू झाली. सुरक्षेसाठी पोलीस व महानगरपालिका प्रशासनाने एक किमी परिघातील परिसर रिकामा करून घेत सेव्हन हिल्स ते सिडको उड्डाणपुलावरील वाहतूक पूर्णपणे बंद करून पर्यायी मार्गाने वळवली.

    छत्रपती संभाजीनगर : चिकलठाणा एमआयडीसीतील एचपी कंपनीच्या प्लांटकडे जाणारे गॅस टँकर सिडको उड्डाणपुलाच्या कठड्यावर चढला. या अपघातामुळे टँकरच्या खालील वॉल्व्ह लिकेज होऊन गॅस गळती सुरू झाली. सुरक्षेसाठी पोलीस व महानगरपालिका प्रशासनाने एक किमी परिघातील परिसर रिकामा करून घेत सेव्हन हिल्स ते सिडको उड्डाणपुलावरील वाहतूक पूर्णपणे बंद करून पर्यायी मार्गाने वळवली. वेळीच परिस्थिती नियंत्रणात आणली नसती, तर स्फोट होऊन घटनास्थळच्या एक किमी परिघातील परिसर खाक झाला असता, अशी माहिती अग्निशमन अधिकारी शिवाजी झणझण यांनी दिली.

    गॅस वाहतूक करणाऱ्या कॅप्सूल टँकर (एचएच ४३ आरपी ५९०२) च्या चालकाचा अंदाज चुकल्याने गुरुवारी पहाटेच्या सुमारास टँकर थेट कठड्यावर चढला. या अपघातात टँकरच्या केबिनचे नुकसान झाले. दुभाजकाचा दणका बसल्याने टँकरच्या खालील व्हॉल्व लिकेज झाला. या घटनेची माहिती अग्निशमन विभागाला मिळाली. त्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. घटनेचे गांभीर्य पाहता, महानगरपालिका आयुक्त, जिल्हाधिकारी, पोलीस आयुक्त, उपायुक्त यांच्यासह एचपी कंपनीचे अधिकारी, तंत्रज्ञ घटनास्थळी पोहोचले. अग्निशमन विभागाच्या पद्मपुरा, सिडको, चिकलठाणा कार्यालयासह गरवारे, बजाज कंपन्यांचे बंबही पाचारण करण्यात आले होते.

    याशिवाय समारे दीडशे ते दोनशे टँकर शहरात कलम १४४ लागू घटनेचे गांभीर्य लक्षात घेता सिडको एन-३, एन-४, एन-५ परिसरातील सर्व शाळा व आस्थपना बंद ठेवण्याचे आदेश निवासी उप जिल्हादंडधिकारी जर्नाधन विधाते यांनी दिले. हा आदेश एक फेब्रुवारी सकाळपासून ते गॅस गळतीची घटना पूर्णतः नियंत्रणात येईपर्यंत अंमलात राहील. नागरिकांनी सुरक्षेचा दृष्टीने योग्य ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले.