वडगावात जुगार अड्ड्यावर सहाय्यक पोलिस उपाधीक्षकांच्या पथकाचा छापा, ९ जण ताब्यात; अनेकांचे धाबे दणाणले!

लोणावळा विभागाचे सहायक पोलिस अधीक्षक सत्यसाई कार्तिक यांच्या पथकाने रविवार ( दि २७ ) रोजी वडगाव परिसरात सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर छापा टाकला. या कारवाईत पोलिसांनी ९ जणांना अटक केली आहे.

  वडगाव मावळ : लोणावळा विभागाचे सहायक पोलिस अधीक्षक सत्यसाई कार्तिक यांच्या पथकाने रविवार ( दि २७ ) रोजी वडगाव परिसरात सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर छापा टाकला. या कारवाईत पोलिसांनी ९ जणांना अटक केली आहे. त्यांच्याकडून सहा लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

  याप्रकरणी दिनेश सौदानसिंग चौहान (वय ३२ वर्षे, रा. आंबेडकरनगर, वडगाव मावळ ता. मावळ जि. पुणे.) राजेश मारूती तरस (वय ४३ वर्षे रा. किवळे) ता. हवेली जि. पुणे) अंकुश अशोक सुखडे (वय ३३ वर्षे रा. आंबेडकरनगर वडगाव मावळ ता. मावळ जि. पुणे) नंदकुमार खंड ढोरे (वय ५७ वर्षे ढोरे वाडा वडगाव मावळ ता. मावळ जि. पुणे.) अविनाश बाळू काजळे (वय ३१ वर्षे रा. नायगाव ता. मावळ जि. पुणे.) रोहित अशोक ढोरे (वय २४ वर्षे, रा. ढोरे वाडा ता. मावळ जि. पुणे) अजय कैलास दवणे (वय २७ वर्षे रा. माउ ता. मावळ जि. पुणे) सागर भानुदास जांभळे वय (३२ वर्षे रा. माउ ता. मावळ जि. पुणे) गजानन भिमा बाळशंकर (वय ४० वर्षे, रा. तळेगाव स्टेशन ता. मावळ जि) यांना अटक करण्यात आली आहे.

  पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार लोणावळा उपविभागाचे सहा. पोलीस अधिक्षक यांना माहिती मिळाली होती की, वडगाव मावळ गावच्या हद्दीत आंबेडकर कॉलनी येथील एका पत्राच्या शेडमध्ये काही इसम जुगार खेळत व खेळवित आहेत.

  दरम्यान या महितीआधारे पोलिस पथकाने रविवार दि १७ रात्री ९ वाजता वडगाव पशुवैदयकीय दवाखाना शेजारी असलेल्या पत्रा शेड मध्ये छापा टाकला त्यामध्ये इसम हे तिन पत्ते नावाचा जुगार खेळत व खेळवित असताना मिळुन आले, त्यांना ताब्यात घेवून त्यांची झडती घेतील असता, जुगाराची साधने ५२ पानाची पत्ते, असे दोन कॅट तसेच रोख रक्कम ४२६०० रुपये १० मोबाईल तसेच दोन चार चाकी वाहने असा एकूण ६४१७०० रू किंमतीचा मुद्देमाल जागीच जप्त करण्यात आलेला असुन, आरोपी यांना ताब्यात घेण्यात आलेले आहे. त्यांच्यावर वडगाव मावळ पोलीस ठाण्यात महाराष्ट्र जुगार प्रतिबंध अधिनियम सन १८८७ अधिनिया प्रमाणे कायदेशिर कारवाई करण्यात आलेली आहे.

  सदर कारवाई मध्ये पो.हवा नायकुडे, पो. शि शिंदे, पो. शि पवार, पो. हवा संजय सुपे, पो. ना, शशिकांत खोपडे, पो. कॉ अंकुश पाटील यांनी छापेकामी योग्य ती मदत केली आहे. गुन्ह्याचा पुढील तपास म. पोसई आर. आर. मोहिते या करीत आहेत.

  आगामी गणेशउत्सव काळात गणपती मंडळातील सदस्य कोणत्याही प्रकारचा जुगार किंवा बेकायदेशिर अवैध धंदे करणार नाहीत याबाबत सुचीत करण्यात आलेले आहे.