गुहागरमध्ये दोन बसचा भीषण अपघात! २५ ते ३० प्रवासी जखमी

    रत्नागिरी : महाराष्ट्रात (Maharashtra)  दिवसेंदिवस अपघातांची मालिका वाढतच आहे. सोमवारी सकाळी रत्नागिरी (Ratnagiri) जिल्ह्यातील गुहागरमध्ये (Guhagar) दोन बसची समोरासमोर धडक होऊन गंभीर अपघात झाला आहे. या अपघात २५ ते ३० प्रवासी जखमी झाले असून दोन्ही बसच्या चालकांना गंभीर दुखापत झालेली आहे.

    गुहागर मार्गावरून जाणारी चिपळूण धोपावे बस आणि गुहागर डेपोची बस अवघड वळणावर चालत असताना समोरासमोर आल्याने दोन्ही बसची जबर धडक झाली. या धडकेत दोन्ही बसचे नुकसान झाले असून वाहनाच्या समोरील भाग हा आत गेला आहे. दुखापत ग्रस्थ प्रवासाची आणि चालकांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जखमींमध्ये शाळकरी विद्यार्थ्यांचाही समावेश आहे. मुसळधार पावसामुळे बचाव कार्यात अडथळे निर्माण होत आहे. गुहागर पोलीस आणि स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने बचाव कार्य सुरु केल्याची माहिती मिळत आहे.