ओव्हरटेकच्या नादात झाला भीषण अपघात; वाहनाची वीज खांबाला धडक, चिमुकल्यासह तीनजण ठार

साक्षगंध कार्यक्रमाला जाताना ओव्हरटेकच्या नादात भरधाव चारचाकी वाहन वीज खांबावर धडकून झालेल्या अपघातात चिमुकल्यासह तीन जण ठार झाले, तर सहा प्रवासी गंभीर जखमी झाले. ही घटना तालुक्यातील एकोडी (दांडेगाव) येथे मंगळवारी दुपारी अडीचच्या सुमारास घडली. जखमींवर वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरू आहे.

    गोंदिया : साक्षगंध कार्यक्रमाला जाताना ओव्हरटेकच्या नादात भरधाव चारचाकी वाहन वीज खांबावर धडकून झालेल्या अपघातात चिमुकल्यासह तीन जण ठार झाले, तर सहा प्रवासी गंभीर जखमी झाले. ही घटना तालुक्यातील एकोडी (दांडेगाव) येथे मंगळवारी दुपारी अडीचच्या सुमारास घडली. जखमींवर वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरू आहे.

    छाया अशोक इनवाते, अनुराधा हरिचंद कावळे, देवांश (वय 15 महिने) (सर्व रा. करटी (बुज.), ता. तिरोडा) अशी मृतांची नावे आहेत. तिरोडा तालुक्यातील करटी येथील साक्षगंधासाठी पाहुणे मंगळवारी गोंदिया तालुक्यातील जुनेवानी येथे चारचाकी वाहनाने जात होते. या वाहनात चालकासह बारा जण प्रवास करत होते. दुपारी 2.30 वाजताच्या सुमारास वाहन ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात चालक अतुल नानाजी पटले (अर्जुनी परसवा) याचे नियंत्रण सुटले आणि दोन-तीन पलट्या खाऊन दांडेगाव येथील रोहिणी बिरणवार यांच्या घराच्या जवळील वीज खांबाळा धडक देत विटांच्या ढिगाऱ्यावर आदळले.

    यामध्ये छाया इनवाते, अनुराधा कावळे यांचा जागीच मृत्यू झाला, तर सहा जण गंभीर जखमी झाले. जखमींना गोंदिया शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि केटीएस रुग्णालयात हलविण्यात आले. देवांश या पंधरा महिन्यांच्या चिमुकल्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

    तर बिरजुला गुडन ठाकरे (वय 35, रा. आरंभाघोटी जि. बालाघाट), अहिल्या नामदेव कोडवाते (वय 62, रा. करटी तिरोडा), तसेच वाहन चालक अतुल नानाजी पटले (वय 23, रा. अर्जुनी परसवाडा) यांच्यावर उपचार सुरु आहेत. तपास पोलिस निरीक्षक बनसोडे यांच्या मार्गदर्शनात गंगाझरी पोलिस प्रथकाकडन सरु आहे.