mobile theft
प्रतिकात्मक फोटो

उद्योगनगरीत गेल्या काही दिवसांपासून मोबाईल हिसकावून घेण्याच्या घटना घडल्या आहे. असाच एक मोबाईल चोर मोबाईल हिसकावून पळ काढत होता. मात्र, त्याच्या गाडीने त्याला धोका दिला अन् तो नागरिकांच्या हातात सापडला.

    वाळूज : उद्योगनगरीत गेल्या काही दिवसांपासून मोबाईल हिसकावून घेण्याच्या घटना घडल्या आहे. असाच एक मोबाईल चोर मोबाईल हिसकावून पळ काढत होता. मात्र, त्याच्या गाडीने त्याला धोका दिला अन् तो नागरिकांच्या हातात सापडला. आरोपी आयता हातात सापडल्याने त्याला नागरिकांनी धू…धू…धुतले.. घटनास्थळी तत्काळ पोलीस दाखल झाल्याने त्याला अटक करण्यात आले. त्याची अंगझडती घेतली असता सुमारे आठ मोबाईल जप्त करण्यात आले आहेत.

    गेल्या काही दिवसांपूर्वी मोहटा देवी चौकामध्ये वडगाव कोल्हाटीचे उपसरपंच यांचा मोबाईल दुचाकीस्वाराने पळवला होता. या घटनेनंतर असे अनेक प्रकार समोर आले होते. दरम्यान, 11 मार्च रोजी रात्री नऊ ते दहाच्या सुमारास कामगार चौकातून मोहटा देवीकडे अनंता बापूराव काळे हा विद्यार्थी मोरे चौकाकडे जात होता. दरम्यान, त्याला फोन आल्याने तो फोनवर बोलत पायी चालला होता. ही संधी साधत पल्सर मोटालसायकलवर (क्रमांक MH 05 CE 5237) आलेल्या राजकुमार साहा या चोरट्याने त्यांचा मोबाइल हिसकावून पळ काढला.

    पोलीस घटनास्थळी

    गाडी बंद पडल्याने आरोपीला कुठे पळावे सूचेना. तेव्हा त्याने गाडी सोडून पळ काढला. मात्र, तोपर्यंत चोर-चोर असे आनंदा ओरडत होता. नागरिकांच्या लक्षात येताच त्यांनी आरोपीला पकडले. तो मोबाइल चोर असल्याचे जेव्हा सगळ्यांना कळाले तेव्हा सगळ्यांनी त्याच्यावर हात साफ केला.