एटापल्ली तालुक्यात ट्रॅक्टर-दुचाकीची समोरासमोर धडक; बापलेकीचा मृत्यू

ट्रॅक्टर व दुचाकीची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात दुचाकीस्वार बाप-लेकीचा मृत्यू झाला. हा अपघात एटापल्ली तालुक्यातील तुमरगुंडा महादेव मंदिराजवळच्या वळणावर बुधवारी सकाळी अकराच्या सुमारास झाला.

    गडचिरोली : ट्रॅक्टर व दुचाकीची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात दुचाकीस्वार बाप-लेकीचा मृत्यू झाला. हा अपघात एटापल्ली तालुक्यातील तुमरगुंडा महादेव मंदिराजवळच्या वळणावर बुधवारी सकाळी अकराच्या सुमारास झाला.

    राजू झुरू आत्राम (45), करिश्मा राजू आत्राम (18) अशी मृतांची नावे आहेत. राजू आत्राम हे आपल्या मुलीसह काही कामानिमित्त बुधवारी सकाळच्या सुमारास एटापल्लीकडे जात होते. दरम्यान, तुमरगुंडा महादेव मंदिराच्या वळणावर समोरुन येणाऱ्या ट्रॅक्टरने दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातात दुचाकीस्वार वडिलाचा जागीच मृत्यू झाला. तर मागे बसलेली मुलगी गंभीर जखमी झाल्याने तिला चंद्रपूर येथे रुग्णालयात नेत असताना चामोर्शी जवळ तिचाही मृत्यू झाला.

    धडक बसल्यानंतर ट्रॅक्टरही समोर जावून उलटला. ट्रॅक्टर सिमेंटच्या बॅग व लोखंडी खांब वाहतूक करीत होते. घटनेची माहिती आलदंडी पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. अधिक तपास आलदंडी पोलिस करीत आहेत.