120 विद्यार्थ्यांनी खचाखच भरला ट्रक, प्रवासा दरम्यान श्वास गुदमरल्याने काही विद्यार्थी बेशुद्ध

ट्रकमध्ये जनावरांना भरतात तसं शालेय विद्यार्थ्यांना ट्कमध्ये कोंबून प्रवास केल्याची संतापजनक घटना गोंदियातून समोर आली आहे.

    गोंदिया : तब्बल 120 विद्यार्थ्यांना एका ट्कमध्ये अक्षरश: कोंबण्यात आलं. यामुळे श्वास गुदमरल्यानं 120 मुलं बेशुद्ध झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. शासकीय आदिवासी आश्रमशाळेतील हा प्रकार असून विद्यार्थ्यांना एका ठिकाणी स्पर्धेसाठी नेण्यात येत होत. या घटनेमुळे शैक्षणिक क्षेत्रात एकच खळबळ उडाली असून, अशाप्रकारे विद्यार्थ्यांना जीव धोक्यात घालून प्रवास केल्याने शाळ प्रशासना विरोधात संताप व्यक्त करण्यात येत आहे.

    गोंदियाच्या मजितपूर शासकीय आदिवासी आश्रमशाळेतील 120 विद्यार्थ्यांना कोयलारी आश्रमशाळेत खेळण्यासाठी ट्रकमधून नेण्यात आलं. यावेळी विद्यार्थ्यांची संख्या जास्त असल्याने अक्षरश: कोंबणयात आले. एका ट्रकमध्ये इतक्या विद्यार्थ्यांना कोंबल्याने श्वास गुदमरुन काही विद्यार्थी बेशुद्ध झाले आहेत. या विद्यार्थ्यांना एकोडी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. एका विद्यार्थिनीला गोंदियाच्या सामान्य रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आलं आहे.