हार्बर मार्गावर दोन तासांचा विशेष ब्लॉक; सीएसएमटी ते वडाळा वाहतूक बंद

आज सकाळी मशीद स्टेशनजवळ नागरी वस्तीच्या एका खाजगी भिंतीचा काही भाग ट्रॅक जवळ कोसळला. ही घटना सकाळी ७.१५ वाजण्याच्या सुमारास झाली. रेल्वे कर्मचाऱ्यांनी पडलेला तो भाग लगेच दूर केला आणि सकाळी ७.३० वाजल्यापासून हार्बर मार्गावरील वाहतूक सुरळीत केली. त्या खाजगी भिंतीचा भाग सुरक्षित करण्यासाठी मुंबई महापालिकेच्या संबधित अधिकाऱ्यांना सांगण्यात आले होते.

    मुंबई : मशीद रेल्वे स्थानकाजवळील (Masjid Railway Station) एका जीर्ण भिंतीचा भाग कोसळला (Wall Collapse). आज सकाळी ही घटना घडल्याने परिणामी सकाळी लोकल वाहतूक १५ मिनिटे उशिराने धावत होत्या. या जीर्ण भिंतीचा भाग काढण्यासाठी मध्य रेल्वेच्या (Central Railway) हार्बर मार्गावर विशेष मेगाब्लॉक (Special Block On Harbour Railway) घेण्यात येत आहे. या आपत्कालीन ब्लॉकच्या दरम्यान सीएसएमटी ते वडाळादरम्यान हार्बर मार्गावर लोकल ट्रेन उपलब्ध राहणार नाहीत. ब्लॉकची वेळ थोड्याच वेळात सांगण्यात येणार आहे.

    ब्लॉकदरम्यान हार्बर मार्गावरील प्रवाशांना कुर्ला, दादर येथून मुख्य मार्गावर प्रवास करण्याची परवानगी दिली असल्याची माहिती मध्य रेल्वेने दिली आहे. आज सकाळी मशीद स्टेशनजवळ नागरी वस्तीच्या एका खाजगी भिंतीचा काही भाग ट्रॅक जवळ कोसळला. ही घटना सकाळी ७.१५ वाजण्याच्या सुमारास झाली. रेल्वे कर्मचाऱ्यांनी पडलेला तो भाग लगेच दूर केला आणि सकाळी ७.३० वाजल्यापासून हार्बर मार्गावरील वाहतूक सुरळीत केली. त्या खाजगी भिंतीचा भाग सुरक्षित करण्यासाठी मुंबई महापालिकेच्या संबधित अधिकाऱ्यांना सांगण्यात आले होते.

    वाहतूक सुरळीत ठेवण्याच्या दृष्टीने हा भाग सुरक्षित करणे महत्त्वाचे असल्याने थोड्याच वेळात दोन तासांचा आपत्कालीन ब्लॉक घेण्यात येत असल्याची माहिती मध्य रेल्वेने दिली आहे. मध्य रेल्वेकडून मुंबई महापालिकेला सर्व प्रकारचे सहकार्य करण्यात येत आहे.