गुटख्याची वाहतूक करणारे वाहन पकडले; चालक-मालका विरुध्द गुन्हा,  १७ लाख २० हजारांचा मुद्देमाल जप्त

कर्नाटक राज्यातून मंगळवेढा मार्गे पंढरपूरकडे बेकायदारित्या गुटखा घेवून जाणारा महिंद्रा पिकअप शहराजवळील ब्रीज जवळ पोलीसांनी पकडून १७ लाख २० हजार वाहनासह मुद्देमाल जप्त करुन वाहन चालक संदीप रामचंद्र लाड (वय ३६), वाहन मालक भूषण बाळासाहेब होमकर (दोघे रा.पंढरपूर) या दोघाविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    मंगळवेढा : कर्नाटक राज्यातून मंगळवेढा मार्गे पंढरपूरकडे बेकायदारित्या गुटखा घेवून जाणारा महिंद्रा पिकअप शहराजवळील ब्रीज जवळ पोलीसांनी पकडून १७ लाख २० हजार वाहनासह मुद्देमाल जप्त करुन वाहन चालक संदीप रामचंद्र लाड (वय ३६), वाहन मालक भूषण बाळासाहेब होमकर (दोघे रा.पंढरपूर) या दोघाविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    कर्नाटक राज्यातील चडचण येथून दि. ६ रोजी सकाळी साडेसहाच्या सुमारास पिकअप (एमएच १३ डीक्यू २६३९)पिकअप बेकायदारित्या गुटखा घेवून येत असल्याची गोपनीय माहिती पोलीस निरीक्षक रणजीत माने यांना मिळाली. त्यांनी मंगळवेढा शहराजवळील रिलाइन्स पेट्रोल पंपाजवळ ब्रीजच्या खाली सापळा लावला असता एक संशयीत वाहन येत असल्याचे पोलीस पथकाला दिसले. पथकाने त्या वाहनाच्या चालकास थांबण्याचा इशारा करतानच चालक संदीप लाड याने वाहन उभे केले. अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांनी वाहनामध्ये काय आहे, असे विचारले असता विमल पान मसाल्याचे पोते असल्याचे त्याने सांगितले. पोलीसांनी वाहनाची तपासणी केली असता पान मसाल्याचे पोते असल्याची खात्री होताच वाहन मंगळवेढा पोलीस ठाण्यात आणून लावले. यामध्ये १ लाख ९८ हजार रुपये किंमतीची ५ पोती विमल पान मसाला, २२ हजार रुपये किंमतीची सुगंधी तंबाखू १ पोते, ७२ हजार रुपये किंमतीचा विमल पान मसाला, ६ लाखाची महिंद्रा गाडी असा एकूण १७  लाख २० हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल पोलीसांनी जप्त केला. सोलापूर येथील अन्न व औषध प्रशासनाचे उमेश भुसे यांनी फिर्याद दिली. अधिक तपास पोलीस नाईक दुधाळ करीत आहेत.