
महिला तक्रार निवारण केंद्रामार्फत मुलीच्या लग्नात झालेला खर्च तिच्या सासरच्या लोकांकडून तडजोड करून मिळवून देण्याच्या बहाण्याने एका महिलेने एक लाखाची फसवणूक केली. हा प्रकार १० व ११ डिसेंबर २०१९ या कालावधीत देहूफाटा आळंदी येथे घडला.
पिंपरी : महिला तक्रार निवारण केंद्रामार्फत मुलीच्या लग्नात झालेला खर्च तिच्या सासरच्या लोकांकडून तडजोड करून मिळवून देण्याच्या बहाण्याने एका महिलेने एक लाखाची फसवणूक केली. हा प्रकार १० व ११ डिसेंबर २०१९ या कालावधीत देहूफाटा आळंदी येथे घडला.
भागवत भीमराव सोमवंशी (वय ५६, रा. देहूफाटा आळंदी) यांनी याप्रकरणी ११ मे २०२२ रोजी दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अल्पना पवार (रा. आंबेगाव खुर्द, पुणे) या महिलेच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्या मुलीच्या लग्नात झालेला खर्च मुलीच्या सासरच्या लोकांकडून तडजोडीच्या माध्यमातून अजिंक्य महिला तक्रार निवारण केंद्र या संस्थेमार्फत मिळवून देते, असे महिलेने फिर्यादी यांना सांगितले. फिर्यादी यांचा विश्वास संपादन करून फिर्यादीकडून एनईएफटीद्वारे एक लाख रुपये स्वीकारले. मात्र, दिलेल्या शब्दाप्रमाणे काम पूर्ण न करता टाळाटाळ करून घेतलेले पैसे परत न देता फसवणूक केली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. दिघी पोलीस तपास करीत आहेत.